धानाच्या या जाती देतील चांगले उत्पन्न; कशी करावी लागवड?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन । भारतातील शेतकऱ्यांना शेती करत असताना चांगले माहित आहे, की कोणते पीक, कोणत्या जाती लावल्यास, कशा पद्धतीने लागवड केल्यास फायदा होईल. अशाच प्रकारे धान म्हणजेच एक काळा तांदूळ म्हणून आहे की ज्याला काळे सोने असेही म्हणतात. या तांदळामध्ये भरपूर औषधी गुण असून आपल्या शरीरासाठी आरोग्यदायी आहे.

पहा कशी केली जाते धानाची शेती

इतर धानशेती प्रमाणेच काळ्या धानाची शेती केली जाते. मे महिन्यात रोपे तयार करून जून महिन्यात रोपांची लागवड केली जाते. भारतात सध्या मणिपूर, आसाम, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, बिहार तसेच इतर राज्यामध्ये काळ्या धानाची शेती केली जात आहे. मात्र प्रामुख्याने ही शेती मणिपूर व आसाम या राज्यातच मोठ्या प्रमाणात होते. या तांदळामध्ये ब जीवनसत्त्व, ई जीवनसत्त्व, कॅल्शियम व लोह, मॅग्नेशियम, झिंक आणि इतर पोषक घटक असल्यामुळे या तांदळास मोठ्या प्रमाणात मागणी वाढत आहे.

बाजारभाव काय आहे

बाजारात या काळ्या तांदळाच्या मागणीचा विचार केल्यास 400 ते 500 रु. प्रति किलो दर आहे. त्याचप्रमाणे आपण साधा तांदूळ विकल्यास त्यास 30 ते 40 रु. प्रति किलो भाव मिळतो. या तांदुळास प्रामुख्याने इंडोनेशिया तसेच आशियाई देशांकडून मागणी जास्त आहे. भारतातही या तांदळात हळूहळू मागणी वाढत आहे, त्यामुळे इतर राज्यातील शेतकरीही या धानपिकाच्या शेतीकडे वळत आहेत. छत्तीसगढ राज्यामध्ये तर ही शेती करण्यासाठी शेतकरी प्रशिक्षण घेत आहेत. बाजारातील मागणीनुसार काळ्या धानाचे उत्पादन घेत असून या शेतकऱ्यांना तेथील सरकारही प्रोत्साहन देत आहे.

error: Content is protected !!