सातबारा उताऱ्यामध्ये राज्य शासनाकडून 11 बदल ; असा असेल Online 7/12

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सातबारा उतारा हा शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्वाचे असणाऱ्या कागदपत्रांपैकी एक आहे. शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकाना सातबारा उतारा (Online 7/12) काढण्यासाठी तलाठी कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. मात्र डिजिटल सातबारा आता काढता येतो त्यामुळे तलाठी कार्यालयात हेलपाटे मारण्याची गरज भासणार नाही. हा उतारा डिजिटल स्वाक्षरीसहित मिळतो. शिवाय हा उतारा सरकारी कामासाठी कुठेही चालतो. राज्य शासनाच्या महसूल विभागाने सातबारा उताऱ्यामध्ये ११ बदल केले आहेत. मागील ५० वर्षात हे बदल झाले आहेत . नव्या बदलामुळे सातबारा काढण्याची प्रक्रिया अधिक सोपी आणि सुलभ करण्यात आली आहे.

कसा आहे डिजिटल सातबारा उतारा

–डिजिटल उतारे अंकीय म्हणजे डिजिटल स्वाक्षरीसह ऑनलाइन स्वरूपात शेतकऱ्यांना उपलब्ध आहेत.
–हेच संगणकीय उतारे बँकांना तसेच कृषी विभागालाही उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
–महसूल मंत्र्यांच्या संकल्पनेनुसार संगणकीय उतारे आता पीडीएफ प्रोफाईल मध्ये रुपांतरीत केले जात आहेत.
–संगणकातील पीडीएफ रूपांतरित सातबाराची (Online 7/12) कागदी प्रत बाहेर काढली जात आहे.
–यावर फोटो आणि लोकेशन मिळेल.

जाणून घेऊया कसा काढायचा डिजिटल सातबारा

स्टेप -१ (लॉग इन )
–सातबारा काढण्यासाठी सगळ्यात गुगलवर bhulekh.mahabhumi.gov.in असं सर्च करावं लागेल.
–त्यानंतर महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाची वेबसाईट दिसेल. या वेबसाईटवर उजवीकडे तुम्हाला Digitally Signed 7/12 हा पर्याय दिसेल.
–यावर तुम्ही क्लिक केल्यास ‘आपला 7/12’ नावाचं एक नवीन पेज तुमच्यासमोर दिसेल.
–तुम्ही जर आधीच या वेबसाईटवर नोंदणी केली असेल, तर लॉग-इन आयडी आणि पासवर्ड वापरून तुम्ही माहिती घेऊ शकता.
–पण, पहिल्यांदाच नवीन सातबारा काढण्यासाठी वेबसाईट ओपन केला असाल, तर मोबाईल क्रमांक वापरूनही तुम्हाला सातबारा (Online 7/12) काढण्याची सोय उपलब्ध आहे.

स्टेप -२ OTP Based Login

–पुढे OTP Based Login या पर्यायावर तुम्हाला क्लिक करा.
–त्यानंतर Enter Mobile Number च्या खालच्या चौकटीत तुमचा मोबाईल नंबर टाका.
— यानंतर Send OTP या पर्यायावर क्लिक करा.
–एकदा का तुम्ही या पर्यायावर क्लिक केलं की, OTP sent on your mobile असा मेसेज येईल.
–त्यानंतर Verify OTP या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
–पुढे तुमच्यासमोर एक आपला सातबारा नावानं नवीन पेज ओपन होईल.
–या पेजवर Digitally signed 7/12, Digitally signed 8A, Digitally signed Property card, Recharge Account, Payment History, Payment Status असे पर्याय दिसतील.

स्टेप -३ माहिती भरा

–पुढे यातल्या Digitally signed 7/12 या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे.
–त्यानंतर ‘डिजिटल स्वाक्षरीत सातबारा’ असं शीर्षक असलेलं पेज तुमच्यासमोर ओपन होईल.
–यासाठी तुम्हाला 15 रुपये देऊन हा सातबारा मिळणार आहे.
–आता डिजिटल सहीचा सातबारा मिळवण्यासाठी तुम्हाला फॉर्मवर दिलेली माहिती भरायची आहे.
–यात जिल्ह्याचं, तालुक्याचं आणि गावाचं नाव निवडायचं आहे.
–त्यानंतर सर्व्हे किंवा गट नंबर टाकायचा आहे आणि सगळ्यात शेवटी डाऊनलोड म्हणायचं आहे.
–त्यानंतर डाऊनलोड झालेला सातबारा तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. यावर स्पष्ट लिहिलेलं असतं की, हा सातबारा डिजटल (Online 7/12) स्वाक्षरीत तयार केला असल्यामुळे त्यावर कोणत्याही सही शिक्क्याची गरज नाही.

Leave a Comment

error: Content is protected !!