शेतकरी बंधूंची कमाल!! सुरू केला अश्वपालन व्यवसाय; 6 घोडे श्रीलंकेला निर्यात करणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात अनेक तरुणांचे नोकरीचे वांदे झाले असून त्यामुळे व्यवसायाकडे अनेकांचा कल वळत आहे. भारत हा कृषीप्रधान देश असल्याने शेतीमध्ये सुद्धा व्यवसाय करण्यासाठी मोठा स्कोप आहे. अनेक शेतकरी शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करून यशस्वी झालेले आहेत. अहमदनगर जिल्ह्याच्या पारनेर तालुक्यात 2 शेतकरी बंधूंनी सुद्धा कमाल करत पारंपरिक शेतीसह खिल्लारी बैले, अश्र्वपालन व्यवसाय सुरू केला आहे.

अभिजित शिंदे आणि राहुल शिंदे असं या दोन्ही बंधूंची नाव असून ते पारनेर मधील रांजणगाव मशीद येथे राहतात. शिंदे बंधूकडील अश्व हे श्रीलंकेत निर्यात केले जात आहेत. शेतीसह शिंदे बंधूंनी अश्वपालन व्यवसाय करत असताना अश्र्वांची विक्री केली. काही दिवसांपूर्वी रांजणगाव मशीद येथे त्यांनी शिंदे सरकार स्टड फार्म सुरू केले . त्यानंतर त्यांनी फार्म हाऊसमध्ये हरियाणा, राजस्थान, काठेवाड, गुजरात या ठिकाणाहून अश्व खरेदी करून त्यांना प्रशिक्षण दिले. सध्या शिंदे बंधूकडे २०० खिल्लारी गाई, १० बैल, ५० शेळ्या, १५ जर्सी गाई आहेत. या आश्र्वांना स्टड फार्ममध्ये ट्रेनिंग दिले जात आहे. तसेच यातील काही घोडे परदेशात निर्यात करण्यात येणार असल्याचे नियोजन शिंदे बंधूंनी केले.

शेतकरी मित्रानो, तुम्हाला कोणताही व्यवसाय करायचा असेल आणि त्यासाठी सरकार कडून मिळणाऱ्या अनुदानाचा लाभ घ्यायचा असेल तर आजच हॅलो कृषी अँप मोबाईल मध्ये डाउनलोड करा. हॅलो कृषीच्या माध्यमातून तुम्ही घरबसल्या आणि अगदी मोफत मध्ये पशुपालन किंवा अन्य व्यवसायावर अनुदान मिळवू शकता. तसेच हॅलो कृषीच्या माध्यमातून तुम्हाला हव्या त्या किमतीमध्ये पशूंची खरेदी- विक्रीही करता येते. त्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअर वर जाऊन हॅलो कृषी अँप डाउनलोड करा आणि सुविधांचा लाभ घ्या.

६ घोड्यांचे परदेशात निर्यातीचे नियोजन

अनेक छोटे – मोठे ४०० अश्व विक्री केले गेले असून, ६ घोडे निर्यात करण्यात येणार असल्याचं म्हटलं जातंय. हे ६ घोडे श्रीलंकेत निर्यात करण्याचे नियोजन शिंदे बंधूंनी केले आहे. तसेच त्यातील १६ घोड्यांना प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षित कर्मचारी नेमण्यात आले आहेत. उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, कर्नाटक, जम्मू आणि कश्मीर या राज्यांमध्ये शिंदे बंधूंच्या घोड्यांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. तसेच शिंदेंच्या अश्र्वानी अश्व प्रदर्शनात नावलौकिक मिळवला आहे. राज्यभर नावाजलेला स्टलियन व्हिक्टर हा अश्व राहुल शिंदे यांच्याकडे आहे. त्याची उंची ६६ इंच असून शिर्डीतील पशुधन प्रदर्शनात देशभरातून ३५ अश्व आले होते. यामध्ये व्हिक्टरने प्रथम क्रमांक पटकावला आहे.

error: Content is protected !!