23 लाख शेतकऱ्यांना फटका; 2600 कोटींची भरपाई द्या : कृषी विभाग

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मागच्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे विदर्भात तसेच मराठवाड्याच्या अनेक भागांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. राज्यात तब्बल 18 लाखापेक्षा अधिक हेक्टर शेतीच नुकसान झालं आहे. लाखो हेक्टर शेती पाण्याखाली गेल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातून खरीप हंगाम गेल्यातच जमा आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या मदतीनुसार जुलै मधील नुकसानीसाठी शेतकऱ्यांना सुमारे 2600 कोटींची नुकसान भरपाई द्यावी असा प्रस्ताव कृषी विभागाने दिला आहे.

नागपुरात सर्वाधिक नुकसान

राज्यात मान्सून जुलैमध्ये दमदार बरसल्यानंतर ऑगस्टमध्ये ही धुवाधार बरसला. याचा सर्वाधिक फटका हा राज्यातील विदर्भ भागाला बसला आहे. विदर्भातील नागपूर विभागात आजवरच्या सरासरीच्या 161 टक्के पाऊस झाला आहे. जून ते १६ ऑगस्ट ची सरासरी ७२८. ९ मिमी असून तिथे आतापर्यंत ११७७. ६ मिमी पाऊस झाला आहे. अमरावती विभागात अतिवृष्टी झाली असून सरासरी ५०६.८ मिमी पाऊस झाला आहे. औरंगाबाद विभागात 135.7 नाशिक विभागात 113.5% पाऊस झालाय मात्र कोकणात सरासरी इतका अर्थात 104.6% तर सर्वात कमी 96.6% पाऊस झाला आहे. पुणे विभागाची सरासरी 653 मिलिमीटर असून इथे प्रत्यक्षात 624.6 मिलिमीटर पाऊस झाला आहे.

23 लाख शेतकऱ्यांना फटका

कृषी विभागाने जुलैमध्ये झालेल्या शेतीच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण केले आहेत त्यानुसार 22 लाख 88 हजार 680 शेतकऱ्यांचे तब्बल 18 लाख 21403 हेक्टर वरचे नुकसान झाले आहे पूर्वीच्या एनडीआरएफच्या निकषानुसार सुमारे 1296 कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्याची शिफारस करण्यात आली आहे मात्र राज्य सरकारने मंगळवारी बदललेल्या निकषानुसार ही रक्कम आता दुप्पट म्हणजेच 2600 कोटी रुपये झाली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!