राज्यातील ‘या’ जिल्ह्यातील 26 हजार शेतकरी PM KISAN योजनेसाठी अपात्र ; 11 कोटी रुपये केले जाणार वसूल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : पीएम किसान सम्मान निधि योजना ही केंद्र सरकारची सर्वात महत्वकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत करोडो शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्षाकाठी सहा हजार रुपयांचे अनुदान थेट खात्यामध्ये जमा केले जाते. मात्र काही अपात्र शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतल्याची बाब समोर आली आहे. या पात्र शेतकऱ्यांवर कारवाई करण्यासाठी केंद्र सरकार ऍक्शन मोडवर आहे. ज्या अपात्र शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे त्यांना आतापर्यंत घेतलेले अनुदान हे परत द्यावे लागणार आहे.

महाराष्ट्रातल्या रायगड जिल्ह्यातही काही अपात्र शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतल्याचा आढळून आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार रायगड जिल्ह्यात एकूण 26 हजार शेतकरी या पीएम किसान सम्मान निधि योजना साठी अपात्र असून त्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. पुणे विभागाच्या कृषी आयुक्तालयाकडून रायगड जिल्ह्याच्या प्रशासनाला अपात्र शेतकऱ्यांची माहिती नुकतीच काही दिवसांपूर्वी देण्यात आली आहे.

11 कोटी रुपये वसूल केले जाणार
या शेतकऱ्यांना आता लवकरात लवकर योजनेचे पैसे जमा करण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे अर्थातच आता रायगड जिल्ह्यातील पी एम किसान योजनेचा अपात्र शेतकऱ्यांकडून सुमारे 11 कोटी रुपये वसूल केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे रायगड जिल्ह्यातल्या जवळपास 26 हजार 618 शेतकरी पी एम किसान योजनेसाठी आवश्यक निकष पूर्ण करण्यास अपयशी ठरले असून हे शेतकरी या योजनेसाठी अपात्र असल्याची माहिती मिळाली आहे.

सात दिवसांचा अल्टिमेटम
यामुळे या अपात्र शेतकऱ्यांकडून आता 11 कोटी 47 लाख 32 हजार रुपये शासनाकडून वसूल केले जाणार आहेत. विशेष म्हणजे या अपात्र शेतकऱ्यांना या योजनेचा पैसा परत करण्यासाठी सात दिवसांचा अल्टिमेटम देखील सरकारने जारी केला आहे. यामुळे निश्चितच आगामी काही दिवसात या योजनेचा चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यास वचक बसणार आहे. शासनाच्या या कारवाईमुळे पीएम किसान योजनेला अजून पारदर्शकता येणार असल्याचे तज्ञांकडून सांगितले जात आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!