हॅलो कृषी ऑनलाईन: वेलवर्गीय पिकात त्रीस्तरीय कटिंग’ (3G Cutting in Cucurbitaceous Crops) पिकाचे उत्पादन वाढवण्यासाठी एक क्रांतिकारी पद्धती आहे. काकडी, दोडका, भोपळा, यासारख्या पिकांची कमी जागेत लागवड करून सुद्धा या पद्धतीने भरपूर उत्पादन घेता येते. वांगी, मिरची, टोमॅटो आणि भेंडी यांसारख्या इतर फळभाजी पिकासाठी सुद्धा ही पद्धत उपयुक्त सिद्ध झालेली आहे. या पद्धतीला इंग्रजीत ‘ थ्री जी कटिंग’ (3G Cutting) असे म्हणतात.
कमी फळधारणा (किंवा लहान आकाराची फळे हा वेलवर्गीय पिकातील (Cucurbitaceous Vegetables) महत्वाची समस्या आहे. पानांद्वारे खते आणि रसायनांची फवारणी, मित्र कीटकांची कमी झालेली संख्या आणि परागीकरणामध्ये झालेली घट हे या समस्येचे मूळ कारण आहे.
त्रीस्तरीय कटिंग (3G Cutting in Cucurbitaceous Crops) ही एक वैज्ञानिक प्रक्रिया आहे ज्याद्वारे रोपातील मादी फुलांची संख्या वाढवून झाडांपासून अधिक उत्पादन मिळवता येते. आपल्या सर्वांना माहित आहे की फळे मादी फुलांपासून विकसित होतात, तर एक नर फुल अनेक मादी फुलांचे परागकण करू शकते. अशा प्रकारे, 3G कटिंग ही शेतकऱ्यांसाठी मादी फुलांची (Female Flowers On Crop) संख्या आणि फळांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सर्वोत्तम वैज्ञानिक (3G Cutting in Cucurbitaceous Crops) सराव आहे.
त्रिस्तरीय कटिंग पद्धती (3G Cutting Method)
- पिकाची लागवड झाल्यावर त्या पिकाची उंची तीन ते पाच फुटापर्यंत वाढू द्यावी.
- सुरुवातीची पाच ते सात पाने येईपर्यंत वेलावर कोणतीही उपशाखा त्या वेलीवर येऊ देऊ नये. उपशाखा आल्यास ताबडतोब खुडून टाकाव्यात (3G Cutting in Cucurbitaceous Crops). कारण या आलेल्या उपशाखावर नर फुलांचे प्रमाण अधिक येते.
- पाच ते सात पानांनंतर येणाऱ्या उपशाखा खुडू नयेत त्या नैसर्गिकरित्या वाढू द्याव्यात.
- वेली पाच ते सात फूट उंचीच्या झाल्यावर त्याच्या मुख्य शाखेचा शेंडा खुडावा. त्यावर त्याची सरळ वाढ थांबून त्यावर उपशाखा येण्यास सुरुवात होते.
- आलेल्या उपशाखांवर 12 ते 15 पाने आली की त्यांचा पुन्हा शेंडा खुडावा. त्यावर पुन्हा उपशाखा येतील. या उपशाखांची पुन्हा वाढ करून घ्यावी.
- या पद्धतीत मुख्य शाखा म्हणजे पहिला स्तर, उपशाखा म्हणजे दुसरा स्तर आणि उपशाखांवर आलेल्या शाखा म्हणजे तिसऱ्या स्तराच्या शाखा होय. या क्रमाने वेलींची वाढ करून घ्यावी.
- तिसऱ्या स्तरावरील फांद्यांची वाढ चांगली होऊ द्यावी. त्यावर मादी फुले येतात. त्यामुळे फळधारणा अधिक होऊन उत्पादन वाढते.
- या वेलींवर जास्त फळधारणा होत असल्यामुळे अन्नद्रव्यांचे आणि पाण्याचे योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे असते.
- तसेच वेलवर्गीय पिकांवर विषानुजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते म्हणून विशेष काळजी घ्यावी लागते (3G Cutting in Cucurbitaceous Crops).
त्रिस्तरीय कटिंगचे फायदे (Advantages Of 3G Cutting)
- रासायनिक खतांचा वापर कमी किंवा न करता एकंदर पीक उत्पादन वाढवता येते.
- सेंद्रिय शेती करणाऱ्या किंवा अल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी त्रिस्तरीय कटिंग पद्धती खूपच उपयुक्त आहे. अल्प भूधारक शेतकरी लहान शेतीतही सुद्धा त्याचे उत्पादन वाढवून चांगला नफा कमवू शकतात.
- अतिरिक्त पैसे न गुंतवता पिकाचे एकूण उत्पादन आणि उत्पन्न वाढवता येते.
- ही पद्धत (3G Cutting in Cucurbitaceous Crops) फळांचा आकार आणि गुणवत्ता सुधारण्यासाठी उपयुक्त आहे, कारण त्रिस्तरीय कटिंग केल्यानंतर फळांचा आकार आणि गुणवत्ता अधिक चांगली झाल्याचे शेतकऱ्यांचे अनुभव आहे.