8 एकरात मिरची लागवडीतून 50 लाखांचे उत्पन्न; 22 वर्षीय तरुण शेतकऱ्याची कमाल!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या देशात बेरोजगारी वाढत असल्याने अनेक युवक व्यवसायाकडे वळत आहेत. भारत हा कृषिप्रधान देश असून शेतीमध्येही कष्ट केल्यास भरपूर नफा कमवता येतो. चंद्रपूर जिल्ह्यातील एका तरुणाने अशाच पद्धतीने आपल्या कष्टाच्या आणि मेहनतीच्या जोरावर ८ एकर मिरची लागवडीतून ५० लाखांची घसघशीत कमाई केली आहे. आणि कष्ट केल्यास फळ हे मिळतंच हेच जगाला दाखवून दिले आहे. साहील मोरे असं सदर युवकाचे नाव असून तो चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील तोहगाव येथे राहतो.

साहिल मोरेने दहावीनंतर हॉर्टिकल्चर सायन्स हा विषय घेतला. त्यानंतर बीएससी ऍग्रीकल्चर घेत आपलं शिक्षण सुरु ठेवलं आहे. आधुनिक शेतीच्या माध्यमातून उत्पादन घेतल्याने लाखो रुपयांपर्यंत कमाई केल्याचं साहिल मोरने सांगितलं आहे. मिरचीचे उत्पादन घेण्याआधी त्याने आधी सोयाबीन – कापसाचे उत्पादन घेतले. त्याची शेती ही वर्धा नदीच्या काठी असल्याने पुराच्या पाण्यात कापूस आणि सोयाबीन उध्वस्त झाले. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये साहिलने मिरचीचे उत्पादन घ्यायला सुरुवात केली. ड्रीपच्या माध्यमातून खतं देऊन पिकांवरील उत्पादन खर्च कमी करणं, कुशल व्यवस्थापन आणि तांत्रिक सल्ला घेऊन त्याने हे यश मिळवलं.

शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सुद्धा तुमच्या शेतात चांगले उत्पन्न मिळवायचे असेल आणि कोणत्याही पिकांची थेट विक्री करायची असेल तर आजच Hello Krushi हे ॲप तुमच्या मोबाईलवर डाउनलोड करा. हॅलो कृषीच्या माध्यमातून नवनवीन पध्दतीने शेती करण्याची चालना मिळेल. तसेच नवनवीन व्यवसायाबद्दल माहिती मिळेल. याशिवाय, कृषी प्रक्रिया, कृषी सल्ले, बी-बियाणे खरेदी विक्री यांसारख्या अनेक सुविधा अगदी मोफत मध्ये मिळत आहेत. त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन आजच हॅलो कृषी अँप डाउनलोड करा

शिक्षण आणि अंगी असलेली कठोर मेहनत याच्या जोरावर साहिलने शेतीमध्ये घवघवीत यश मिळवलं आहे. यावेळी त्याने शेतीला खत किती टाकायचे याबाबत माहिती दिली आहे. शेतीला आवश्यक खत टाकावे. पिकाला ड्रीप असल्यामुळे पाण्याची देखील अधिक बचत होऊन उत्पन्नात वाढ होणार असून फळांची वाढ होते. यामुळे पिकाला चांगला दर मिळण्याच्या संधी उपलब्ध होतात. खतांसाठी अधिक खर्च होत असल्याने ड्रीपचा वापर करावा अशी माहिती साहिलने दिली.

error: Content is protected !!