2022-23 चालू योजना ! औषधे, तणनाशके, जिप्सम, जैविक खते, जैविक कीड नियंत्रण याकरिता मिळेल 50 टक्के अनुदान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो, केंद्राकडून चालू केलेल्या एका योजनेची आज आपण माहिती घेणार आहोत. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान कडधान्य व राष्ट्रीय खाद्यतेल तेल अभियान अंतर्गत २०२२-२०२३ साठी ही योजना लागू असून या योजनेअंतर्गत एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन व एकात्मिक कीड व्यवस्थापन या बाबीसाठी पिक संरक्षण औषधे, तणनाशके, जिप्सम, जैविक खते, जैविक कीड नियंत्रण या निविष्ठांसाठी शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते.

किती मिळणार अनुदान ?

सूक्ष्म मुलद्रव्ये, जिप्सम, जैविक खताच्या एकूण किमतीच्या 50% कमाल 500 रुपयाच्या मर्यादित 2 हेक्टर क्षेत्रासाठी देय आहे. तसेच पिक संरक्षण औषधे, तणनाशके, जैविक कीड नियंत्रण इत्यादी किंमतीच्या 50% किंवा कमाल 500 रुपये हेक्टर देय आहे. एका शेतकऱ्याला कमाल 2 हेक्टर मर्यादित लाभ देय आहे. सध्या खरीप हंगामातील पिकावर कीड रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने शेतकऱ्यांना कृषि विद्यापीठाच्या शिफारशीनुसार निविष्ठा खरेदी केल्यास राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान (NFSM) कडधान्य व राष्ट्रीय खाद्यतेल तेल अभियान सन – 2022-23 उत्पादन वाढीसाठी निविष्ठा पुरवठा घटक -प्रकल्पा बाहेरील या बाबीसाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार खालीलप्रमाणे अनुदान अनुज्ञेय आहे.

आवश्यक कागदपत्रे

१) शेतकऱ्यांनी निकषानुसार निविष्ठा खरेदी केलेली पावती
२)सातबारा उतारा
३)आधारकार्ड
४)बँक खात्यांचा तपशील

काय आहे अंतिम मुदत ?

शेतकऱ्यांनी कागदपत्रे संबंधित तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी कार्यालयाकडे खरीप हंगामासाठी दि.15 सप्टेंबर 2022 पूर्वी व रब्बी हंगामासाठी दि. 30 डिसेंबर 2022 पूर्वी सादर करावेत.त्यानुसार त्यांना अनुज्ञेय असलेले अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट लाभ हस्तांतर पध्दतीने वर्ग करण्यात येईल. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाकडून केले आहे.

टीप :– औषधे, जिप्सम, जैविक खतांसाठी मिळवा 50% अनुदासाठी शेतकऱ्यांनी खतांची खरेदी पावती, सातबारा, आधारकार्ड व बँक खात्यांचा तपशील इत्यादी कागदपत्रे घेऊन संबंधित तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी कार्यालयाकडे जमा करावी.

Leave a Comment

error: Content is protected !!