शेतकऱ्याची नियतीनेही सोडली साथ चाळीतला 500 ते 600 क्विंटल कांदा जाळून खाक , जनावरे बालंबाल बचावली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : निसर्गाचा लहरीपणा, शेतमालाचा घसरलेला भाव हे काही कमी होते म्हणून की काय निफाडमधल्या शेतकऱ्याची नियतीनेही साथ सोडली. बघता बघता होत्याचं नव्हतं झालं. पाहुण्यांच्या लग्नाला गेलेल्या शेतकऱ्याच्या चाळीत ठेवलेल्या कांद्याची जाळून राख झाली आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं. त्यामुळे शेतकरी पूर्णतः हवालदिल झाला आहे. घटनेचा पंचनामा झाला असून काहीतरी मदत मिळावी म्हणून शेतकरी आता आशा लावून बसला आहे.

500 ते 600 क्विंटल कांदा जाळून खाक

निफाड तालुक्यातील काथरगाव येथील राजाराम जगन्नाथ वाघ, डॉ किरण जगन्नाथ वाघ यांनी शेतात कांद्याची लागवड केली होती. यातून त्यांना 500 ते 600 क्विंटल कांद्याचे उत्पादन झालं होतं मात्र. सध्याचा कांद्याचा बाजार भाव बघता हा घसरलेला दिसून येतो आहे. त्यामुळे त्यांनी हा कांदा आपल्या चाळीमध्ये साठवण्याचा निर्णय घेतला आणि दर वाढल्यानंतर हा कांदा विकता येईल असा त्यांचा विचार होता. नातेवाइकांकडे लग्न असल्यामुळे निफाड तालुक्यातील पिंपळस इथं लग्नासाठी संपूर्ण कुटुंब गेलेले असताना दुसरीकडे अचानक कांदाचाळीला आग लागली. आणि बघता बघता चार महिने पोटच्या पोराप्रमाणे जोपासलेला कांदा आगीच्या भक्ष्यस्थानी गेला. या घटनेत 25 ट्रॅक्टर भर म्हणजे जवळपास 500 ते 600 क्विंटल कांदा तसेच दोन मोटरसायकली ही जळून खाक झाल्यात.

वीस लाख रुपयांचे नुकसान

ही बातमी ग्रामस्थांना समजताच ग्रामस्थांनी पुढे येऊन आग विझवण्यासाठी प्रयत्न केला. तोपर्यंत शेतकऱ्याचे मात्र व संपूर्ण नुकसान झालं होतं. विशेष म्हणजे सावलीमध्ये चार ते पाच जनावरे ही बांधण्यात आली होती ती ग्रामस्थांच्या प्रसंगावधानतेमुळे वाचली. मात्र या आगीमध्ये या शेतकऱ्याचा अंदाजे वीस लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेनंतर गावात खळबळ उडाली त्यानंतर गावचे तलाठी घटनास्थळी आले आणि त्यांनी पंचनामा केला या आगीचं नेमकं कारण काय आहे हे अद्याप समोर आले नाही. राजाराम वाघ हे परगावी गेले असताना ही घटना झाल्याने कुणीतरी मुद्दाम आग लावल्याची चर्चा आहे. यासंबंधी योग्य ती कारवाई करून मदत करण्याची अपेक्षा शेतकऱ्याने व्यक्त केली आहे.

कांद्याला कवडीमोल भाव

शेतकरी मित्रांनो संध्याचे कांद्याचे दर बघता कांद्याला कवडीमोल दर मिळत आहे. हा दर इतका कमी आहे की त्यातून उत्पादन घेण्यासाठी निघालेला खर्चही निघत नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कांदा साठवणुकीचा निर्णय घेतला आहे. त्यातही अनेक शेतकऱ्यांकडे साठवणुकीसाठी पर्यायही नाही यात मात्र साठवणुकीतील या कांद्याला अशा रीतीने आग लागल्यामुळे शेतकरी मात्र संकटात आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!