54 शेळ्या एकापाठोपाठ दगावल्या ; घटना पाहून तरुणांच्या पायाखालची जमीनच सरकली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या शेती क्षेत्रात असलेली आव्हाने पाहता. अनेक तरुण शेतीसोबत पशुपालन क्षेत्राकडे वळत आपले नशीब आजमावत आहेत. अनेक तरुण शेळीपालन व्यवसाय करून नफा मिळवत आहेत. भिगवण येथील तरुणांनी देखील असाच काहीसा प्रयत्न करण्याचे ठरवले आणि शेळी पालन व्यवसायात आपले नशीब आजमावण्याचा ठरवले. मात्र शेळ्या विकत आणल्या आणल्या असे काही घडले की त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. नुकत्याच आणलेल्या ५४ शेळया एकामागून एक मरण पावल्या.

या घटनेबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, नितीन पांढरे आणि अतुल घोडके या तरुणांनी पारंपारिक शेती न करता शेतीला जोडधंदा म्हणून शेळीपालन करण्याचा निर्णय घेतला. या व्यवसायात शिरायचे म्हणून अनेक ठिकाणी त्यांनी भेटी देऊन पाहणी केली त्यानंतर काष्टी येथील बाजारातून त्यांनी काही शेळ्या खरेदी केल्या एका पिकप वाहनांमध्ये घालून ते भिगवण येथे आले त्यानंतर भिगवण येथे आणखी काही शेळ्यांची त्यांनी खरेदी केली आणि ते आपल्या घरी निघाले होते.

अन पायाखालची जमीनच सरकली …

त्यानंतर अचानक पणे एकामागून एक शेळ्या अंग टाकू लागल्या त्यामुळे दोघांच्याही पायाखालची जमीन सरकली. त्यांनी तातडीनं पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावून घेतलं. वैद्यकीय अधिकारी तातडीने जागेवर पोहोचले परंतु तोपर्यंत ५४ शेळ्यांनी आपला जीव सोडला होता. नुकत्याच घेतलेल्या शेळ्या कशा काय दगावल्या याचं आश्चर्य या दोघांसह इतरांनाही वाटू लागलं . मोठ्या उमेदीने त्यांनी शेळी पालनाचा व्यवसाय सुरु करायचा म्हणून हे पाऊल उचललं होतं मात्र अचानक काही मिनिटातच होत्याचं नव्हतं झालं. शेळी पालन व्यवसाय करून उत्पन्न मिळवायची आशा आता पूर्णपणे निराशेत बदललेली होती.

या कारणाने शेळ्या दगावल्याची शक्यता

दरम्यान पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी याबाबत प्राथमिक तपासणी करून चार शेळ्यांचे मृतदेह पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवून दिलेत याबाबत तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर रामचंद्र शिंदे यांनी सांगितले की सदर वाहनांमध्ये प्रमाणापेक्षा जास्त शेळ्या ठेवलय गेल्या एक तर वाढता उन्हाळा आणि ज्यादा संख्येमुळे या शेळ्या गुदमरून मेल्या असण्याची शक्यता आहे. याशिवाय त्यांना काही विषबाधा झालेली किंवा काय झालं याची माहिती प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. मात्र या घटनेमुळे नवीन व्यवसाय करु पाहणारे हे दोन्ही तरुण आता पूर्णपणे हात वर झाले आहेत. त्यांच्यावर आलेल्या या परिस्थितीमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!