मेंढपाळांच्या भटकंतीला लागणार ब्रेक ? पशुधन विमा योजनेसह सर्वांगीण विकासासाठी लवकरच निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मेंढपाळांना वर्षानुवर्ष भटकंती करावी लागते. त्यांना या व्यवसायात स्थैर्य आणण्यासाठी आता सरकारकडून प्रयत्न केले जाणार आहेत. मेंढपाळ हा दुर्लक्षित राहिलेला घटक असून त्याला प्रवाहात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार आहेत. मेंढपाळांच्या चराईचा प्रश्न लवकरच मार्गी लावून मेंढपाळांना पशुधन विमा योजना सुरू करण्यात येणार असल्याचे संकेत वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले आहेत. मेंढपाळांच्या प्रलंबित मागण्यांच्या अनुषंगानं मंत्रालयामध्ये एक बैठक पार पडली यावेळी समाजाच्या विकासासाठी सर्वसमावेशक योजना राबवण्यात येणार असल्याचे आश्वासन दत्तात्रय भरणे यांनी दिले आहे. याबाबतची माहितीही त्यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंट वरूनही दिली आहे.

या गोष्टींवर दिला जाणार भर

— शासनाकडून बंदिस्त किंवा अर्थ बंदिस्त मेंढी पालन व्यवसायाला प्रोत्साहन देणे
— कायमस्वरूपी एका ठिकाणी राहून मेंढीपालन करणाऱ्या मेंढपाळांना शेडचे बांधकाम करून देणे.
— मोकळ्या जागी पिण्याचे पाणी चारा बियाणे बहुवार्षिक गवत प्रजातीचे बियाणे उपलब्ध करून देण्याबाबत योजना प्रस्तावित करण्याच्या सूचना भरणे यांनी बैठकीदरम्यान दिले आहेत.

दरम्यान, पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी मेंढी विकास महामंडळाच्या सक्षमीकरणासाठी शंभर कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. सध्या राज्यात ७३ तालुक्यात फिरते पशुचिकित्सालय आहे. शिवाय लवकरच ८० तालुक्यांमध्ये ही सुविधा वाढवण्याचा प्रयत्न शासन करीत असल्याची माहिती बैठकीदरम्यान देण्यात आली. फिरता पशुचिकित्सालय याचा लाभ घेण्यासाठी 19 62 हा टोल फ्री क्रमांक आहे त्याचा लाभ मेंढपाळांनी घ्याव्या असे आवाहन देखील मंत्री भरणे यांनी बैठकीदरम्यान केला आहे

Leave a Comment

error: Content is protected !!