Fig Farming : बुलढाण्यातील शेतकऱ्याने अंजिराच्या शेतीतून कमावले लाखो रुपये

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात आणि देशात शेतकरी हल्ली नवनवीन प्रयोग करत आहेत. याचा फायदा शेतकऱ्यांना होऊ लागला आहे. यामुळे शेतकरी आधुनिक शेतीची कास धरत नव्या वाटा शोधताना दिसत आहे. अशातच परभणी शहरापासून काही किमी अंतरावर सिंगणापुर नावाचं गाव आहे. या गावात माणिक खिल्लारी नावाचे शेतकरी आहेत. यांनीच अंजिराची शेती करत लाखो रुपयांचा नफा मिळवला आहे.

माणिकराव यांनी वडिलोपार्जित मिळवलेल्या ११ एकर शेतात रात्रंदिवस काम केलं. २०१७ ला अंजीर लागवडीचा निर्णय घेतला. यावर्षी त्यांनी ३०० रोपांची लागवड केली आहे. २०१९ मध्ये आणखी २०० रोपांची लागवड केली आहे. अंजीरप्रमाणे सोयाबीन पिकांची लागवड करून घरखर्च भागवला जाईल असा त्यांचा प्रयत्न होता. माणिकरावांनी अंजिरातून उत्पन्न मिळवून २०२० आणि २०२१ या वर्षामध्ये माणिक खिल्लारे यांनी अंजीर विक्रीतून खर्च वजा करता दोन ते अडीच लाख रुपयांचं निव्वळ उत्पन्न मिळालं आहे. यामुळे ते ग्राहकांना थेट खरेदी करताना दिसत आहेत.

ग्राहकांना थेट खरेदी :

उत्पन्न चांगलं मिळावं या उद्देशाने आता माणिकराव हे अंजीर व्यापाऱ्यांना न विकता थेट ग्राहकांना विकतात. अंजिराचे दर कमी – अधिक होत असल्याने माणिकराव यांना स्वतःच अंजीर विक्रीचा निर्णय घेतला आहे. राज्य शासनाच्या वतीने शेतकरी ते थेट ग्राहक या संकल्पनेनुसार ग्राहकांपर्यंत शेतमाल पुरवला जातो. वरिष्ठ जिल्हा अधिकारी यांनी देखील अंजीराची खरेदी केली आहे. पारंपरिक शेतीऐवजी आता खिल्लारी यांनी आधुनिक शेतीचा अवलंब करत आर्थिक शेती उन्नतीचा मार्ग अवलंबला आहे. इतर गावातील काही नागरिकांनी या शेतीला भेट दिली आहे.

error: Content is protected !!