सोलापुरातील शेतकऱ्याने आंब्याला दिले शरद पवारांचं नाव; सांगितलं ‘हे’ कारण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील आणि देशातील कृषी व्यवसायात नवनवीन प्रयोग घडतात. या प्रयोगातून शेतकरी नवनवीन शक्कल लढवत शेती करत आहेत. आतापर्यंत आपण काळया रंगाचे टोमॅटो तसेच इतर रंगाचे आंबे ऐकलं असावं. मात्र आता आंब्याच्या कलामाला माजी कृषीमंत्री शरद पवार यांचं नाव एका बहाद्दर शेतकऱ्याने दिलं आहे. यामुळे या विषयाची चर्चा सर्वत्र पहायला मिळत आहे.

सोलापुरच्या माढा तालुक्यात सध्या आंबा महोत्सव सुरू आहे. या आंबा महोत्सवात शेतकऱ्याने एका आंब्याच्या जातीला माजी कृषिमंत्री शरद पवारांचे नाव दिलं आहे. दत्तात्रय गाडगे असे या आंब्याच्या शेतकऱ्याचे नाव असून ते माढा तालुक्यातील अरण मधील रहिवाशी आहेत. शरद मँगो असं या मँगोचे नाव ठेवण्यात आलं आहे. गाडगे यांच्या आंब्याचे वजन हे अडीच किलो असून हे आंबे सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. या आंब्याला ग्राहकांकडून चांगली मागणी मिळत आहे. या आंब्यावर प्रयोग करून अडीच किलोचा आंबा पिकवला आहे त्यामुळे ग्राहकांना आंब्यातून चांगली मागणी मिळत आहे. या कलमाची २० ते २५ शेतात झाडे आहेत. तसेच या कलमांना शरद पवारांचं नाव देण्याचं नेमकं कारण देखील सांगितलं आहे.

शरद पवारांचे नाव देण्यामागील उद्देश :

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना शरद पवार यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी फळबाग योजना राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. याच योजनेतून आठ एकरमध्ये सात हजार आंब्याची झाडे लावल्याचे गाडगे यांनी सांगितले आहे. यामुळे अडीच किलोच्या आंब्याला गाडगे यांनी शरद पवारांचे नाव दिलं आहे.

error: Content is protected !!