सेंद्रिय खत म्हणून हिरवळीचे खत एक चांगला पर्याय ; जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : हिरवळीचे खत म्हणजे शेतात वाढलेल्या हिरव्या वनस्पतीची पाने किंवा पानांसह कोवळ्या फांद्या बाहेरून आणून जमिनीत पुरणे होय. जमिनीचे आरोग्य आणि उत्पादकता टिकवण्यासाठी सेंद्रिय खतांची गरज आहे. सेंद्रिय खत म्हणून हिरवळीचे खत एक चांगला पर्याय आहे. ही पिके जमिनीतील नत्रासोबत सुक्ष्म अन्नघटकांच्या पुरवठ्याबरोबरच जमिनीचे भौतिक गुणधर्मही सुधारण्यास मदत करतात.

हिरवळीच्या खतासाठी कोणत्या पिकांचा समावेश ?

  • यात हिरवळीचे पिक शेतात वाढवून फुलोऱ्यापूर्वी जमिनीत गाडले जाते. यात धैंचा ,चवळी पिकांचा समावेश होतो.
  • हिरवळीचे पिक शेताबाहेर बांधावर किंवा पडीक जमिनीवर वाढवून त्यांची कोवळी पाने आणि फांद्या आणून शेतात गाडल्या जातात. यात गिरिपुष्प , सुबाभूळ, शेवरी या पिकांचा समावेश होतो.
  • धैंचा, चवळी पिकांमध्ये ०.४९ टक्के नत्र असते. तर गिरिपुष्प, सुबाभूळ, शेवरी यांसारख्या पिकांच्या वाळवलेल्या पानांमध्ये २.४३ ते २.७४ टक्के नत्र उपलब्ध असते.
  • धैंचा, ताग ही पिके हिरवळीची खते म्हणून उत्कृष्ट आहेत. ही द्विदल वर्गातील पिके असल्याने त्यांच्या मुळांवर नत्र शोषण करणाऱ्या जीवाणूंच्या गाठी असतात.
  • हे जीवाणू हवेतील नत्र स्थिरीकरणाचे काम करतात. धैंचा हे हिरवळीचे पिक क्षारयुक्त, चोपण तसेच आम्लयुक्त हलक्या अथवा भारी प्रकारच्या जमिनीत घेता येते.
  • हिरवळीचे पिक हलक्या ते भारी, पाण्याचा निचरा होणाऱ्या सर्व प्रकारच्या जमिनीत घेऊ शकतो.
  • या पिकांमध्ये आंतर मशागत, तण नियंत्रण आणि ओलिताची आवश्यकता नसते. पिक फुलोऱ्यावर येण्यापूर्वी नांगरून किंवा ट्रॅक्टरच्या सहाय्याने जमिनीत गाडले जाते.
  • साधारणपणे शेंगवर्गीय पिकांपासून बनविलेले १ टन हिरवळीचे खत १.८ ते ३.० टन शेणखताच्या बरोबर असते.

संदर्भ : ऍग्रोवन

Leave a Comment

error: Content is protected !!