साताऱ्यातील महिलेने सुरू केली मधनिर्मिती; वर्षाकाठी 300 ते 400 किलो मध उत्पादन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात आता शेती व्यवसायात नवनवीन प्रयोग निर्माण होताना दिसत आहेत. सांगलीमध्ये खराब झालेल्या द्राक्षापासून वाईन बनवण्याचा प्रयोग यशस्वी झाला होता. आता अशातच साताऱ्यातील पाटण तालुक्यातील रोहिणी पाटील यांनी मधनिर्मिती केली आहे. रोहिणी यांचे पती नोकरी करत असल्याने रोहिणी पाटील शेतीची जबाबदारी सांभाळत आहेत. बचत गट उभारणीसाठी माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्यासोबत झालेल्या चर्चेतून मधमाशीपालनाला पाटण तालुक्यात चांगला वाव असून, बाजारपेठेतही अधिकाधिक चांगली संधी मिळेल असे रोहिणी यांच्या लक्षात आले.

अशावेळी रोहिणी पाटील आणि इतर १४ जणांनी मिळून मधमाशिपालन करण्याचा अभ्यास सुरू केला. यामुळे त्यांना मधमाशी पालणातून फायदा, धोके याची माहिती मिळू लागली. त्यावेळी त्यांना व्यवसायात फायदा होऊ लागला. रोहिणी ताईंना मधमाशा पेट्या स्वतः तयार करण्याचे ठरवले आहे. सुरुवातीला पेटी भरताना वेळी मधमाशांनी चावे घेतले. यामुळे चेहरा, त्वचेवर सूज यायची तरीही त्यांनी न डरता मधमाशांचे पालन करणे सुरूच ठेवले.

राणीमाशी ओळखण्यापासून ते मधमाश्‍यांची वसाहत तयार करण्यास सुरुवात केली. मधमाश्यांची वसाहत यशस्वी झाल्यावर रोहिणीताईंनी स्वतःच्या ५० पेट्या गावाजवळील जंगलात ठेवण्यास सुरुवात केली आहे. तसेच अशा कामात हळूहळू यश मिळू लागले. यामुळे जंगलात ठेवल्यामुळे सेंद्रिय खत मिळण्यास हातभार लागला आहे.

सप्टेंबर ते डिसेंबर महिन्यात मधमाश्यांची वसाहत केली जाते. फेब्रुवारी, एप्रिल महिन्यांत पेटीतील मधाचे संकलन केले जाते. एका वर्षात अंदाजे सात किलो मधाचे उत्पादन घेतले जात असून ‘फॉरेस्ट हनी’ ब्रॅण्डची निर्मिती केली आणि बाजारात विक्रीसाठी हे मध आणले. तसेच ‘कृषिकन्या उद्योग समूह’ स्थापन करून मधावर प्रक्रिया करण्यास सुरुवात केली. या कामगिरीच्या जोरावर त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

रोहिणी पाटील यांना मिळालेले पुरस्कार :

बिझनेस वूमन ॲवॉर्ड, पावर वूमन, गूगल बिझनेस रिंग स्टार ॲवॉर्ड, पाटण तालुका सुवर्णकन्या पुरस्कार, महाराष्ट्राची नवदुर्गा सन्मानपत्र, ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट कॉलेज, बारामती यांनी देखील सन्मानपत्र देऊन रोहिणी पाटील यांना सन्मानित केलं आहे.

error: Content is protected !!