Aadhar Card Update: आधार कार्ड बाबत महत्वाची बातमी! लवकर करा ‘हे’ काम, नाहीतर होईल नुकसान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन:आधारकार्ड (Aadhar Card Update) हे सध्याच्या घडीला अतिशय महत्त्वपूर्ण असे ओळखपत्र बनले आहे. या आधारकार्डमुळे आपल्याला विविध सरकारी योजनांचा लाभ मिळतो. तसेच बँक खाते खोलण्यासही या आधारकार्डची गरज लागते.आधार कार्डशिवाय आपले कोणतेही शासकीय काम होणार नाही. त्यामुळे आधारकार्ड आपल्यासोबत असणं जरुरीचं आहे. असं असताना आता आधारकार्डशी संबंधित एक मोठी बातमी समोर येत आहे. सरकार 65 हजार नागरिकांचं आधारकार्ड रद्द करण्याची शक्यता आहे. सरकार अपडेट करण्यासाठी नंतर फीज किंवा पैसे आकारु शकते. कारण UIDAI ने 10 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त जुन्या आधारकार्ड धारकांना आपली माहिती अपडेट करण्यासाठी मोफत ऑनलाईन सुविधा (Aadhar Card Update Online Service) प्रदान केली आहे.

विशेष म्हणजे सरकारने आधारकार्डची माहिती अपडेट (Aadhar Card Update) करण्यासाठी अनेक वेळा डेडलाईन दिली आहे. पण तरीसुद्धा हजारो नागरिकांनी त्यांचे आधारकार्ड अपडेट केलेले नाही. त्यामुळे मिळालेल्या माहितीनुसार, भोपाळ शहरातील 65 हजार नागरिकांचे आधारकार्ड रद्द होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आधारकार्ड अपडेट करणे जास्त आवश्यक आहे. ज्या नागरिकांनी अद्यापही आपले आधारकार्ड अपडेट केलेलं नाही त्यांनी तातडीने ‘MyAadhaar’ पोर्टलवर जावून आपली माहिती अपलोड करणे आवश्यक आहे.

आधारकार्ड अपडेट करणे का आवश्यक आहे? (Aadhar Card Update)

गेल्या 10 वर्षांमध्ये आपला फोटो आणि रहिवासी पत्ता यामध्ये बदला झालेला असू शकतो. त्यामुळे आपले आधारकार्ड अपडेट करणे आवश्यक आहे. आधारकार्डद्वारे ज्या फसवणुकीच्या घटना होतात त्या रोखण्यासाठी देखील याची मदत होणार आहे. तसेच यामुळे शासनाला देखील योग्य माहिती मिळणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, UIDAI ने 10 वर्षांआधीचे आधारकार्ज अपडेट करण्यासाठी 14 डिसेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. या डेडलाईनला याआधी सलग तीन वेळा वाढवण्यात आलेलं आहे. याआधी 14 मार्च, त्यानंतर 14 जून, त्यानंतर 14 सप्टेंबर अशी डेडलाईन सरकारकडून याआधी देण्यात आली होती. आता हीच डेडलाईन 14 डिसेंबरपर्यंत आहे. ही डेडलाईन शेवटची मानली जात आहे. त्यानंतर कदाचित सरकारकडून कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.

आधारकार्ड अपडेट कसे करावे?

आधारकार्ड अपडेट (Aadhar Card Update) करण्यासाठी सर्वात आधी ‘MyAadhaar’ च्या https://uidai.gov.in/en/ ’या पोर्टलवर जाऊन लॉगिन करा. त्यानंतर आपला आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकावा. यानंतर तिथे विचारण्यात आलेले उपयुक्त कागदपत्रे अपलोड करा. आपली ओळख आणि नव्या कागदपत्रांसाठी आवश्यक दस्तावेज अपलोड करा. ही अपडेशन सेवा मोफत आहे. या सेवेचा फायदा घेऊन लवकरात लवकर तुमचे आधारकार्ड अपडेट करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

आधारकार्ड अपडेट करण्यासाठी आवश्यक दस्तावेज कोणकोणते?

रेशनकार्ड
मतदान ओळखपत्र
रहिवासी दाखला
मनरेगा/एनआरईजीएस जॉब कार्ड
श्रम कार्ड
भारतीय पासपोर्ट
पॅन/ई-पॅन कार्ड
सीजीएचएस कार्ड
ड्राइविंग लायसन्स

error: Content is protected !!