अपघातग्रस्त शेतकऱ्यांची जुनी योजना बंद; या नवीन योजनेस प्रारंभ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : अपघातग्रस्त शेतकऱ्यांसाठी अपघात विमा योजना सुरू होती. मात्र आता ही जुनी योजना बंद करून काही दिवसांपासून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना राज्यभरात लागू करण्यात आली आहे. जुनी शेतकरी अपघात विमा ही योजना योग्यरीत्या विमा कंपनी राबवत नसल्याने आधीची योजना बंद करून नवीन गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना सुरू केली.

थोडंसं जुन्या योजनेबद्दल

शेतकरी अपघात विमा योजनेबद्दल बोलायचं झालं तर या योजनेबद्दल दोन लाख रुपये अनुदान दिलं जात होतं. मग त्यातील प्रत्येक कुटुंबातील मुलगा – अविवाहित मुलगी, आई – वडील, पती – पत्नी यापैकी दोन व्यक्तींना कवच कुंडल या योजनेमार्फत गेल्या पाच वर्षात दिलं जात होतं. मात्र विमा कंपन्या योग्यरीत्या ही योजना राबवत नसल्याने नवीन योजना राबवण्यात आल्याचं कृषी विभागाने सांगितलं आहे.

योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास हे करा

शेतकरी मित्रांनो शेती व्यवसायात शेती पिकांचे उत्पादन घेण्यासाठी सरकार अनेक योजनांतर्फे अनुदान पुरवत असते. यातून शेतकऱ्यांचे होणारे अपघात याची परतफेड म्हणून योजनेचा लाभ मिळवणे महत्वपूर्ण असते. अशातच या योजनेचा लाभ घेण्यासाठी Hello krushi हे ॲप डाऊनलोड करा. गूगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello krushi हे ॲप सर्च करा आणि इंस्टॉल करा. यात विविध योजना दर्शवल्या जातात. त्यातून आवश्यक योजना निवडून या योजनेद्वारे अर्ज प्रक्रिया करून या योजनेचा लाभ मिळवू शकता.

थोडंसं नवीन योजनेबद्दल

या योजनेच्या माध्यमातून अपघातग्रस्त शेतकरी, अपंगत्व, जखमी शेतकरी, मृत्यू शेतकरी, वीजेच्या धक्क्यामुळे अपघात, सर्पदंश आणि विंचुदंश, विषबाधा अशा अनेक इतर दुर्दैवी अपघातामुळे होणारे मृत्यू या योजनेतून अपघातग्रस्त शेतकरी किंवा शेतकऱ्याच्या वारसदारास योजनेतून लाभ देण्यात येणार आहे. याचा फायदा हा योजनेचा लाभ मिळवणाऱ्या शेतकऱ्यांना होणार आहे.

शेतकऱ्यांना मिळणार हा लाभ

अपघातामुळे २ लाख रुपये किंवा अपघातामुळे दोन डोळे किंवा दोन अवयव निकामी झाल्यास २ लाखांचे अनुदान जाहीर करण्यात येणार आहे. अपघातामुळे १ डोळा आणि १ अवयव निकामी झाल्यास २ लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे. १ डोळा आणि अवयवाचा एक भाग निकामी झाल्यास १ लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे. अपघात घडल्यानंतर ३० दिवसांत प्रस्ताव तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे सादर करायचा आहे. तसेच त्यानंतर याची पुढील प्रक्रिया ही तालुकास्तरीय समिती करणार आहे.

error: Content is protected !!