Admirable Work : कौतुकास्पद! 100 एकराचा मालक करतोय पुण्याईचे काम; वाचून तुम्हीही कराल सलाम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : आजपर्यंत आपण शेतकऱ्यांच्या अनेक यशोगाथा ऐकल्या (Admirable Work) असतील. अमुक शेतकऱ्याने या पिकातून इतके उत्पन्न मिळवले. तमुक शेतकऱ्याने या पिकाच्या लागवडीतून इतकी कमाई केली. मात्र एक शेतकरी देवदूत बनून, अपघातामध्ये जखमी झालेल्या व्यक्तीच्या मदतीसाठी स्वतः आपली ऍम्ब्युलन्स घेऊन फोन येताच घटनास्थळी (Admirable Work) जातो. याबाबत कधी ऐकलंय का? नाही ना? मग आम्ही आज तुम्हाला अपघातात जखमी झालेल्या नागरिकांच्या मदतीला धावून जात पुण्याई कमावणाऱ्या शेतकऱ्याबद्दल सांगणार आहोत…

एखाद्या व्यक्तीचे प्राण वाचवणे, याला भारतीय संस्कृतीमध्ये पुण्याईचे (Admirable Work) स्थान देण्यात आले आहे. उत्तरप्रदेशातील फतेहपुर जिल्ह्यातील शेतकरी अशोक तपस्वी हे देखील असेच काहीसे आगळेवेगळे काम करत आहे. अशोक यांनी एक ऍम्ब्युलन्स विकत घेतली असून, ते आसपासच्या परिसरात एका फोनवर स्वतः ऍम्ब्युलन्स घेऊन अपघातात जखमी झालेल्या नागरिकांची मदत करत आहेत. सरकारी विभागाची ऍम्ब्युलन्स पोहोचो अथवा ना पोहोचो अशोक यांनी ऍम्ब्युलन्स मात्र काही मिनिटांमध्ये जखमींच्या मदतीसाठी उपलब्ध असते. दिवस असो वा रात अशोक निरंतर हे काम करत आहे. त्यांच्या याच कामाची पोहोच पावती म्हणून उत्तरप्रदेश आणि केंद्र सरकारने देखील त्यांचा सन्मान केला आहे.

हजारो जखमींना मदत (Admirable Work Of Farmer Ashok Tapaswi)

अशोक तपस्वी यांच्या माहितीनुसार, त्यांनी आतापर्यंत 400 हुन अधिक मृत्युमुखी आणि 3000 हजारहून अधिक जखमींना आपल्या ऍम्ब्युलन्सच्या माध्यमातून मदत केली आहे. ते म्हणतात रस्ते अपघातात कोणाला आपला जीव गमवावा लागू नये म्हणून आपण 24 तास या कामात स्वतःला वाहून घेतले आहे. हे काम केल्याने मनाला एक सुकून मिळतो. त्यांनी आतापर्यंत हजारो जखमींना दवाखान्यात पोहोच करण्याचे पुण्याईचे काम केले आहे.

100 एकर शेतीचा मालक

अशोक यांच्याकडे स्वतःची 100 एकर जमीन आहे. मात्र आपण जोपर्यंत जिवंत आहे. तोपर्यंत हे पुण्याईचे काम करत राहणार आहोत. मात्र शेती करत करत त्यांनी मागील 16 ते 17 वर्षांमध्ये त्यांनी आतापर्यंत हजारो लोकांचे प्राण वाचवले आहेत. इतकेच नाही तर अशोक आपल्या शेतीमध्ये एक आगळेवेगळे पीक घेत आहे. ते म्हणजे भारतीय संस्कृतीमध्ये विवाहित महिला सिंदूर लावतात. ते कुंकू एका विशिष्ट झाडापासून तयार होते. अशा सिंदूरची एक आगळीवेगळी शेती आपल्या जमिनीमध्ये ते करत आहेत. या शेतीमधून आतापर्यंत 35 लाख रुपयांची कमाई केली असल्याचे ते सांगतात.

error: Content is protected !!