शेतकऱ्यांच्या खिशाला कात्री ; DAP खताच्या किंमतीमध्ये वाढ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : अधिच महागाईचा सामना करीत असलेल्या शेतकरी वर्गाच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री लागणार आहे, कारण इंधना पाठोपाठ खतांच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. प्रमुख भारतीय सहकारी संस्था इफकोने डाय अमोनिअम फॉस्फेट (DAP )आणि एनपीके खतांच्या किमतीत वाढ केली आहे. शेतीकरिता सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या डीएपी खताच्या किमतीत १५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. आगोदरच इंधनाच्या दरवाढीने शेतकऱ्यांना अधिकच खर्च करावा लागतो आहे. त्यात आता खरीप हंगाम जवळ आला असताना डीएपी खताच्या या दर वाढीमुळे शेतीसाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.

यापूर्वी देखील इफको सहित अन्य कंपन्यांनी खतांच्या किमतीमध्ये मोठी वाढ केली आहे. मात्र भारत सरकार कडून खतांवर देण्यात येणाऱ्या अनुदानात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर वाढलेल्या किमतींचा प्रत्यक्ष परिणाम नाही झाला. मात्र सध्याचा विचार करता आंतरराष्ट्रीय स्तरावर खते आणि खतांसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. रशिया – युक्रेन यांच्यात चाललेल्या युद्धामुळे ही परिस्थिती आल्याचेही बोलले जात आहे.

देशात दरवर्षी जवळपास 70 ते 72 लाख टन डीएपीची आयात होते. पोटॅश आयात 50 लाख टनांच्या दरम्यान राहते ही आयात मुख्यतः बेलारुस आणि रशियातून केली जाते. बेलारूस मधून 20 टक्के आयात होते. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात भारत सरकारने रशियासोबत खत आयातीचे दीर्घ कालीन करार केलेले खत उपलब्ध तेथील अडचणी आणि वाढत्या किमतीमुळे शास्वत खत उपलब्धतेसाठी हा करार करण्यात आला असे सरकारच्या वतीने सांगण्यात आले. या कराराच्या माध्यमातून भारतात दरवर्षी डीएपी आणि पोटॅशची प्रत्येकी दहा लाख टन आणि एनपीके ची आठ लाख टन खतांची आयात करणार आहे असं स्पष्ट केलं यावरून भारताचा रशिया वरील अवलंबित्व लक्षात येतं.

पोषक खतांच्या निर्मितीची तर रशिया पहिल्या चार देशांमध्ये तो नायट्रोजन आणि फॉस्फेट खतांमध्ये रशिया जगात चौथ्या क्रमांकावर आहेत तर पोटॅश निर्मितीमध्ये तिसऱ्या, पोट्याश निर्मितीत बेलारुस दुसऱ्या स्थानावर येतो. रशियावर खतांसाठी अवलंबून असलेल्या देशांची संख्या 30 पेक्षा अधिक आहे. खतांसाठी केवळ भारतच रशियावर अवलंबून आहे असं ही नाही चीन आणि ब्राझील मध्ये 30% खत रशियातून घेतात. परंतु युद्धामुळे खतांचा पुरवठा विस्कळित होतो. तसेच ही परिस्थिती लवकर निवळी नाहीतर किमती आणखी वाढू शकतात असंही खत उद्योगातील जाणकारांचं मत आहे

Leave a Comment

error: Content is protected !!