Agri Business : शेणासंबंधित हे व्यवसाय करतील तुम्हाला धनवान! जाणून घ्या एका क्लिकवर…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : उत्पादन खर्चात झालेली वाढ आणि त्यातच अवकाळी पाऊस, दुष्काळ अशा लहरी हवामानामुळे (Agri Business) शेतकऱ्यांना शेती करणे अवघड होऊन बसले आहे. त्यामुळे सध्या अनेक तरुण शेतकऱ्यांचा ओढा शेतीआधारित उद्योगांकडे असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र आज आम्ही तुम्हाला अशा एका व्यवसायाबद्दल सांगणार आहोत. ज्यातून तुम्ही अनेक उत्पादने उत्पादित करत मोठा नफा कमावू शकता. चला तर मग जाणून घेऊया कोणता आहे तो व्यवसाय (Agri Business) जो तुमच्यासाठी बेस्ट असणार आहे.

ग्रामीण भागामध्ये शेती व्यवसाय आणि शेण यांचा जवळचा संबंध (Agri Business) असून, ते गावाकडे हमखास उपलब्ध होते. मात्र आता याच शेणापासून एक-दोन नव्हे तर अनेक उत्पादने उत्पादित करत चांगला व्यवसाय करू शकता. विशेष म्हणजे या व्यवसायासांसाठी तुम्हाला अधिक भांडवलाची गरज नसणार आहे. हे सर्व व्यवसाय शेती आणि पशुपालनाशी संबंधित आहेत. जे तुम्हाला अल्पावधीत अधिक पैसे मिळवून देऊ शकता.

शेणापासून अगरबत्ती बनवणे (Agri Business Dung Related Will Make Rich)

गाईला आणि तिच्या शेणाला भारतीय संस्कृतीमध्ये विशेष स्थान आहे. गाईची मनोभावे पूजा केली जाते तर तिच्या शेणाला पवित्र मानले जाते. त्यामुळे याच गाईच्या शेणापासून अगरबत्ती बनवत तुम्ही चांगला नफा मिळवू शकतात. गाईच्या शेणापासून बनवलेल्या अगरबत्तीला विशेष मागणी असून, त्या बनवण्यासाठी तुम्ही अधिक गुंतवणूक न करता घरबसल्याही तुम्ही हा व्यवसाय करू शकता.

शेणापासून दिवे बनवणे

शेणापासून दिवे बनवणे हा एक व्यवसाय करण्याचा उत्तम पर्याय असून, त्याद्वारे तुम्ही मोठ्या बाजारपेठेची निर्मिती करू शकता. कारण देशातच नाही विदेशातही शेणाच्या दिव्यांना खूप मागणी असते. या व्यवसायाला भांडवलाची गरज नसते. तो तुम्ही घरबसल्या ही करू शकता. यासाठी तुम्हाला शेण वाळवून त्याची पावडर बनवावी लागेल. त्यानंतर त्यात डिंकाचा वापर करून दिवे बनवतात. दोन ते चार दिवस उन्हात वाळवून बाजारात चांगल्या दरात सहज विकता येते.

शेणापासून भांडी बनवणे

लोक सध्या पर्यावरणपूरक वस्तूंच्या वापराकडे वळत आहे. त्यामुळे शेणापासून बनवलेल्या छोट्या-छोट्या भांड्यांना विशेष महत्व प्राप्त झाले आहे. अशी भांडी किंवा कुंडी बाजारात ५० ते १०० रुपयांना विकली जातात. विशेष म्हणजे त्यांच्या वापरानंतर ती खत म्हणूनही वापरली जाऊ शकतात. त्यामुळे ग्राहक बिनदिक्कतपणे त्यांची विक्री करतात.

शेणापासून लाकूड व्यवसाय

हिंदू संस्कृतीत माणूस मरण पावल्यानंतर अंतिम संस्काराला एक वेगळेच महत्व आहे. मृत्युनंतर माणसाला जाळण्यासाठी लाकूड आणि गोवऱ्या यांची आवश्यकता असते. मात्र सध्या वृक्षतोड मोठ्या प्रमाणात झाल्याने, शेणापासून बनवलेल्या लाकडाचा व्यवसाय (Agri Business) केला तर पर्यावरणाला मोठा हातभार लागेल. इतकेच नाही तर गाईच्या शेणापासून लाकूड बनवले तर वृक्षतोड थांबण्यास मदत होणार आहे. त्यामुळे अंतिम संस्कारासाठी गाईच्या शेणाचे लाकूड तुम्ही तयार करू शकता. हे लाकूड तयार करण्यासाठी हे मशीन मिळते. जी ५० हजाराच्या आसपास मिळते. त्यातून तुम्ही मोठी कमाई करू शकता.

शेणापासून खत व्यवसाय

शेण हे एक प्रकारचे सेंद्रिय खत आहे. आजही गावातील शेतकरी शेणखत म्हणून वापरतात. जर तुम्ही या गोष्टीचा व्यवसाय सुरू केला तर तुम्ही काही वेळात श्रीमंत होऊ शकता. किंबहुना, सध्या शहरांतील लोक आपली बाल्कनी भांड्यांनी भरत आहेत आणि त्या कुंड्यांतील झाडे वाढवण्यासाठी सेंद्रिय खताचा वापर करत आहेत. म्हणूनच तुम्ही या व्यवसायात नक्की यशस्वी व्हाल.

error: Content is protected !!