Agri education : सरकारनेही शेतीचे महत्व ओळखले; पहिलीपासून मुलांना शेतीचा अभ्यास!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शाळकरी विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच शेतीविषयक ज्ञान (Agri education) मिळाले तर पुढील जीवनात त्यांना त्याचे महत्व निश्चितच समजण्यास उपयुक्त ठरणार आहे. ही बाब लक्षात घेऊन राज्यातील विद्यार्थ्यांना शेतीविषयक माहिती मिळण्यासाठी, पहिली पासूनच्या अभ्यासक्रमात ‘कृषी’ या विषयाचा (Agri education) पुढील शैक्षणिक वर्षात समावेश करण्यात येणार आहे, अशी घोषणा राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे.

दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात आयोजित ‘आधु‌निक कृषी शिक्षणाची संधी: भविष्याची उज्ज्वल नांदी’ या विषयावरील कार्यशाळेचे उद्घाटन केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. शेतीची शास्त्रशुद्ध माहिती घेऊन, व्यावहारिक शेती केली तर चांगल्या प्रकारचे अर्थार्जन होऊ शकते. त्यामुळेच विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणापासून शेतीविषयक माहिती मिळण्यासाठी पहिलीपासून कृषीचा शालेय शिक्षणात समावेश येणार आहे, असेही केसरकर यावेळी म्हणाले आहे.

शेतीकडे ओढा वाढेल (Agri education childrens study from 1st std)

कृषी विषयाचा समावेश शालेय शिक्षणाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याबाबतचा मसुदा शिक्षण विभागाने स्वीकारला आहे. कृषी केंद्रीत आशयामुळे शेतीचे अध्ययन होईल. शेतीकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढेल. तसेच शेती व शेती व्यवसाय करणाऱ्यांबद्दल जाणीव व संवेदनशीलता निर्माण होईल, त्यामुळे चालू वर्षापासून पहिलीपासून कृषी शिक्षण सुरू करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. असेही केसरकर यांनी सांगितले आहे.

शिक्षकांना कृषी शिक्षणाचे प्रशिक्षण

मात्र हा निर्णय लागू करताना विद्यार्थ्यांना शेतीचे ज्ञानार्जन करताना जिल्हा परिषद शिक्षकांना अडचणी येऊ शकतात. यासाठी राज्यातील कृषी विद्यापीठांशी करार करण्यात आला असून, त्या-त्या विभागातील कृषी विद्यापीठांकडून शिक्षकांना कृषी शिक्षणाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. असेही ते यावेळी म्हणाले आहे. दरम्यान, अनेक वर्षांपासून शालेय अभ्यासक्रमात कृषी या विषयाचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ तसेच कृषी विद्यापीठांकडून केली जात होती. सरकारच्या या निर्णयामुळे आता मुलांना शेतीची लहानपानापासूनच माहिती मिळण्यास मदत होणार आहे.

error: Content is protected !!