Agri Research : दोन शेतकऱ्यांचा दिल्लीत सन्मान; शेती संशोधनाबद्दल डॉक्टरेट पदवी प्रदान!

0
2
Agri Research Farmers' Awarded By Doctorate
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतीमध्ये शेतकरी दररोज नवनवीन संशोधन (Agri Research) करत असतात. कोणी शेतातील कामे सुखकर व्हावी म्हणून जुगाडू यंत्र बनवतात. तर कोणी नवनवीन पिकांची लागवड करतात. मात्र आता सिंधुदुर्गातील दोन शेतकऱ्यांनी केलेल्या संशोधनाची दखल थेट दिल्ली येथील इंडिया इंटरनॅशनल सेंटर या संस्थेने घेतली आहे. मालवण येथील शेतकरी उत्तम सूर्यकांत फोंडेकर आणि वेंगुर्ला येथील अनंत दिगंबर आजगांवकर या दोघांना त्यांनी केलेल्या शेती क्षेत्रातील संशोधनाबद्दल (Agri Research) संस्थेकडून मानाची डॉक्टरेट पदवी देण्यात आली आहे.

राज्यात कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी (Agri Research) करणारे अहमदनगर जिल्ह्यातील हिवरे बाजार गावचे आदर्श सरपंच डॉ. पोपटराव पवार यांना पहिली डॉक्टरेट पदवी गेल्या वर्षी प्रदान करण्यात आली आहे. त्यानंतर आता या सिंधुदुर्गातील दोन शेतकऱ्यांना अशा प्रकारची दुर्मिळ डॉक्टरेट प्रदान करण्यात आली आहे. 28 डिसेंबरला दिल्लीत ‘इंडिया इंटरनॅशनल सेंटर येथे कुलगुरू, कुलसचिव, कृषी उच्चायुक्त आणि अंबासि इकॉनॉमिक चान्सलर यांच्या हस्ते गोल्ड मेडल, ऑर्डरसहित ही डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. त्यामुळे या दोघांचेही सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

कृषी क्षेत्रात मोलाचे कार्य (Agri Research Farmers’ Awarded By Doctorate)

मागील तीन वर्षात हापूस आंब्यांचे सर्वाधिक आणि गुणवत्तापूर्ण उत्पादन घेण्याच्या कार्याबद्दल आणि संशोधनबद्दल शेतकरी उत्तम सूर्यकांत फोंडेकर यांना तर लाल भेंडीमध्ये संशोधन करून ब्राऊन, पिस्ता, वेलवेट रेड या जाती निर्माण केल्याच्या संशोधनबद्दल शेतकरी अनंत दिगंबर आजगांवकर या दोघांना नोव्हेंबर महिन्यात ही डॉक्टरेट जाहीर करण्यात आली होती. दोनच दिवसांपूर्वी दिल्ली येथे झालेल्या एका समारंभात या दोघांनाही ही मानाची डॉक्टरेट पदवी देण्यात आली आहे. दरम्यान, शेतकरी अनंत आजगांवकर यांनी विकसित केलेल्या भेंडीच्या प्रजातींची अखिल भारतीय पातळीवर चाचणी होऊन या तीनही जातींचे अधिकार आजगावकर यांना प्रदान करण्यात आले आहे.