Agricultural Labourer : शेतमजूर परवडेना… महाराष्ट्रातील शेतमजुरीत 31 टक्क्यांनी वाढ!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतमजुर आणि शेतकरी यांचे जवळचे नाते आहे. मात्र सध्या शेतमजूर (Agricultural Labourer) मिळत नसल्याने अनेकांना शेती करायची अशी? असा प्रश्न पडला आहे. काहींनी तर मजूर (Agricultural Labourer) मिळत नाही म्हणून पीक पद्धतीत बदल केला आहे. अशातच आता गेल्या तीन वर्षांमध्ये महाराष्ट्रातील शेतमजुरीमध्ये 31 टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे समोर आले आहे. सध्यस्थितीत 2023 या वर्षामध्ये राज्यात पुरुष शेतमजुराला सरासरी 303.5 रुपये इतकी रोजंदारी मिळते. जी 2020 मध्ये सरासरी 231.8 रुपये इतकी मिळत होती.

मात्र असे असले तरी देशातील शेतमजुरांच्या (Agricultural Labourer) सरासरी रोजंदारीच्या तुलनेत महाराष्ट्रातील रोजंदारी ही कमी आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (आरबीआय) हॅण्डबुक अँड स्टॅटिस्टिक्सच्या आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष 31 मार्च 2023 पर्यंत देशातील ग्रामीण भागातील शेतमजुरांना 345.70 रुपये इतकी सरासरी रोजंदारी मिळत आहे. दरम्यान, कर्नाटकमध्ये 379.5 रुपये, आंध्रप्रदेशमध्ये 384.4 रुपये शेतमजुरी मिळते. ज्यात मागील तीन वर्षांमध्ये महाराष्ट्रानंतर मोठी वाढ झाली आहे. कर्नाटकात शेतमजुरीमध्ये 30 टक्के तर आंध्रप्रदेशात 27 टक्के तर केरळात शेतमजुरीमध्ये 9 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

सर्वाधिक रोजंदारी मिळणारी राज्ये (Agricultural Labourer Daily Wages In India)

दरम्यान, देशातील कोणत्या राज्यांमध्ये शेतमजूरांना सर्वाधिक रोजंदारी मिळते, याबाबतची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. केरळ या दक्षिणेकडील राज्यामध्ये शेतमजुरांना सर्वाधिक 764 रुपये इतकी रोजंदारी दिवसाला मिळते. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर हिमाचल प्रदेश (473.3 रुपये), तिसऱ्या क्रमांकावर तामिळनाडू (470 रुपये) चौथा क्रमांक हरियाणा (424.8 रुपये) आणि पाचव्या क्रमांकावर पंजाब (393.3 रुपये) ही सर्वाधिक शेतमजुरी मिळणारी राज्ये आहेत.

सर्वात कमी रोजंदारी मिळणारी राज्ये

मागील 7 वर्षांचा विचार करता मध्यप्रदेश या राज्यांमध्ये शेतमजूरांना सर्वात कमी मजुरी दिली जात आहे. मध्यप्रदेशमध्ये शेतमजुरांना सर्वात कमी 229.2 रुपये इतकी मजुरी मिळते. त्यानंतर गुजरातमध्ये 241.9 रुपये, बिहारमध्ये 308.7 रुपये रोजंदारी मिळते. दरम्यान, 2023 मधील महिला शेतमजुरांची आकडेवारी समोर येऊ शकली नाही. मात्र, 2011 पर्यंत देशातील महिला शेतमजुरांना पुरुष शेतमजुरांच्या तुलनेत दररोज 88 रुपये कमी मिळत होते.

error: Content is protected !!