Agriculture Advisory: रबी पिकांच्या व्यवस्थापनाबाबत मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी कृषी तज्ज्ञांचा खास सल्ला!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: सध्या काही ठिकाणी रब्बी हंगामाची (Agriculture Advisory) लागवड सुरु आहे. तर काही पिकात आंतरमशागतीची कामे सुरु आहेत.  अगोदर लागवड झालेल्या काही पिकांवर किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. सध्याच्या परिस्थितीत विविध पिकांचे नियोजन कसे करावे यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील (VNMKV, Parbhani) तज्ज्ञांनी खास मराठवाड्याच्या शेतकऱ्यांसाठी (Marathwada Farmers) कृषी सल्ला (Agriculture Advisory) दिलेला आहे. जाणून घेऊ या सविस्तर.  

रबी पिकांसाठी कृषी तज्ज्ञांच्या शिफारशी (Rabi Crop Advisory)

  • पूर्व हंगामी उसाची लागवड लवकरात लवकर संपवावी. ऊस लागवड (Sugarcane Planting) करतांना 30 किलो नत्र, 85 किलो स्फुरद व 85 किलो पालाश (327 किलो 10:26:26  किंवा 185 किलो डायअमोनियम फॉस्फेट + 142 किलो म्युरेट ऑफ पोटॅश  किंवा 65 किलो युरिया + 531 किलो सिंगल सुपर फॉस्फेट + 142 किलो म्युरेट ऑफ पोटॅश) प्रति हेक्टरी खतमात्रा द्यावी.
  • ऊस पिकावर खोड किडीचा (Sugarcane Stem Borer) प्रादुर्भाव दिसून आल्यास व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस 20 % 25 मिली किंवा क्लोरॅट्रानोलीप्रोल 18.5% 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी (Agriculture Advisory).
  • ऊस पिकावर पांढऱ्या माशीचा (Sugarcane White Fly) प्रादुर्भाव दिसून येत आहे, व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30 % 36 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  • हळद पिकात कंदमाशीचा (Turmeric Pest Control) प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 15 दिवसांच्या अंतराने क्विनालफॉस 25% 20 मिली किंवा डायमिथोएट 30 % 15  मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आलटून-पालटून फवारणी करावी. (हळद पिकावर केंद्रीय किटकनाशक मंडळातर्फे लेबल क्लेम नसल्यामूळे विद्यापिठ शिफारशीत संशोधनाचे निष्कर्ष दिले आहेत).
  • हळदीचे उघडे पडलेल कंद मातीने झाकून घ्यावेत. हळद पिकात आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.  
  • हळदीच्या पानावरील ‍ठिपके / करपा रोग याच्या व्यवस्थापनासाठी अझोक्सिस्ट्रॅाबिन 18.2% + डायफेनकोनॅझोल 11.4% (पुर्वमिश्रित बुरशीनाशक) 10 मिली + 5 मिली स्टीकरसह प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी (Agriculture Advisory).
  • जोमदार वाढीसाठी हरभरा पीक सुरुवातीपासूनच तण विरहीत ठेवणे आवश्यक आहे. पीक 20 ते 25 दिवसाचे असतांना पहिली कोळपणी करावी. 
  • मागील काही दिवसात किमान तापमानात झालेल्या घटीमूळे, वेळेवर लागवड केलेल्या करडई पिकात माव्याचा प्रादुर्भाव दिसून येत आहे, व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30% 13 मिली किंवा असिफेट 75% 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  • करडई पिकात तणांच्या व्यवस्थापनासाठी पेरणीनंतर 25 ते 50 दिवसापर्यंत एक ते दोन कोळपण्या व खुरपणी करून घ्यावी.
  • लवकर पेरणी केलेल्या रब्बी ज्वारी पिकात लष्करी अळीचा (Sorghum Army Worm) प्रादुर्भाव दिसून येत असल्यास व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5 टक्के  4 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून पावसाची उघड बघून फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी (Agriculture Advisory).

फळबागेचे व्यवस्थापन (Fruit Orchard Management)

  • संत्रा/मोसंबी बागेत फळवाढीसाठी 00:00:50 15 ग्रॅम प्रति लिटर तसेच जिब्रॅलिक ॲसिड 1 ग्रॅम प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  • संत्रा/मोसंबी बागेत आंतरमशागतीची (Intercultural Operations) कामे करून तण नियंत्रण करावे व आवश्यकतेनुसार पाणी द्यावे. डाळींब बागेत फळवाढीसाठी 00:00:50 15 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी (Agriculture Advisory).
  • डाळींब व चिकू बागेत आंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे व आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.
error: Content is protected !!