हॅलो कृषी ऑनलाईन : विविध प्रकारचे खाद्यपदार्थांशी संबंधित व्यवसाय (Agriculture Business) हे खूप मागणी असणारे व कमी भांडवलात चांगला नफा देणारे व्यवसाय ठरतात. व्यवसायाची सुरुवात करताना मुळातच छोट्या प्रमाणात आणि कमी गुंतवणुकीतून तसेच त्याला बाजारपेठेमध्ये असणारी मागणी कोणत्या पद्धतीचे आहे. या गोष्टींचा विचार करून केली तर यश हमखास मिळते. याच पार्श्वभूमीवर आज आपण अशाच एका शेतीआधारित व्यवसायविषयी (Agriculture Business) माहिती घेणार आहोत.
बाजारपेठेत कायम मागणी (Agriculture Business For Farmers)
मसाले म्हटले म्हणजे प्रत्येक घरातील प्रत्येक स्वयंपाकघर मसाल्याशिवाय (Agriculture Business) अपूर्णच असते असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. देशभरात लाखो टन विविध प्रकारचे मसाले यांचे उत्पादन भारतात होते. मसाले तयार करताना त्याची चव उत्तम ठेवणे खूप गरजेचे असते. तुम्ही तयार केलेल्या मसाल्याची चवदार सर्वोत्कृष्ट असेल तर तुमचा मसाला हा शंभर टक्के विकला जाणार यात कुठलीही शंका नाही. यासाठी तुम्हाला बाजारपेठेचे जुजबी ज्ञान असणे गरजेचे असून तुमच्या तयार मसाल्याची मार्केटिंग करण्याची पद्धत खूप उपयोगी आहे.
‘या’ व्यवसायासाठी लागणारे भांडवल
खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या प्रोजेक्ट रिपोर्टनुसार मसाला बनवण्याचा एक युनिट स्थापन करण्यासाठी साडेतीन लाख रुपये खर्च येतो. या गुंतवणुकीतून तुम्हाला यासाठी आवश्यक तीनशे चौरस फूट जागा साठ हजार रुपये आणि त्यासाठी लागणारी मशिनरी यासाठी 40 हजार रुपये खर्च येतो. या महत्त्वाच्या बाबीनंतर अनेक छोट्या-मोठ्या गोष्टी करण्यासाठी देखील खर्च लागतो आणि उत्पादन सुरू होईपर्यंतचा खर्च इत्यादी मिळून उत्पादन सुरू होईपर्यंत अडीच लाख रुपये लागतात.
भांडवल कसे उभे करायचे?
प्रत्येकाकडे व्यवसाय स्थापन करण्यासाठी संपूर्ण पैसा स्वतःचा असेल असे नाही. यासाठी तुम्ही सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून बँकेकडे कर्जासाठी अर्ज करू शकतात. इतकेच नाही तर मसाला व्यवसायासाठी पंतप्रधान रोजगार योजनेच्या माध्यमातून देखील कर्जाची सुविधा मिळू शकते. दुसरे म्हणजे पंतप्रधान मुद्रा योजना देखील तुम्हाला मदत करू शकते.
कसे असते नफ्याचे गणित?
खादी आणि ग्रामोद्योग महामंडळाच्या अहवालानुसार एका वर्षात तुम्ही 193 क्विंटल मसाल्याचे उत्पादन घेऊ शकतात. प्रति क्विंटल मसाल्याचा भावाचा विचार केला तर तो पाच हजार चारशे रुपये पकडला तर एका वर्षात दहा लाख 42 हजार रुपयांची विक्री शक्य आहे. यामधून एका वर्षाचा खर्च वजा केल्यावर प्रतिवर्ष दोन लाख 56 चार रुपयांपर्यंत नफा मिळणे शक्य आहे. याचाच प्रतिमहिना विचार केला तर वीस ते 21 हजार रुपये नफा मिळू शकतो. तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी तुम्ही स्वतःची एक वेबसाईट तयार करून त्या वेबसाइटवर तुम्ही तयार केलेल्या मसाल्याच्या संपूर्ण माहिती देऊ शकतात. वा एखादे सोशल मीडिया पेज ओपन करून तुम्ही तुमच्या उत्पादनाची माहिती लोकांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचवू शकतात.