Agriculture Business : शेती करताना जर पिकांची योग्य निवड केली तर आपल्याला त्याच्यातून उत्पन्न जास्त मिळते. परिणामी आपल्याला नफा देखील चांगला राहतो. मात्र बऱ्याचदा शेतकऱ्यांना काही शेती पिकांविषयी माहिती नसते त्यामुळे शेतकरी कायम तेच तेच पिके घेत असतात. यामुळे शेतकऱ्यांना काहीतरी नवीन पिके घेण्याची गरज आहे. आज आम्ही तुम्हाला अशा तीन पिकांबद्दल माहिती सांगणार आहोत जी तीन पिके तुम्हाला खरोखर करोडपती बनवू शकतील.

जमीन मोजणी, बाजारभाव, सातबारा उतारा, सरकारी योजना अशा बाबी मोबाईलवरून करण्यासाठी इथे क्लिक करून App डाउनलोड करा
1) गवती चहा (Herbal tea)
तुम्ही जर गवती चहाची लागवड केली तर त्यातून तुम्ही चांगले पैसे कमवू शकताय कारण की, गवती चहाला फक्त आपल्या देशामध्येच नाही तर बाहेरील देशांमध्ये देखील मोठी मागणी आहे. गवती चहाचा वापर अनेक औषधे तसेच खाण्याच्या पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात केल्या जातो. यामुळे याला बाजारात देखील मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्याचबरोबर यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे गवतीचे चहाचे जे तेल आहे त्या तेलाला सर्वात जास्त मागणी असते. त्याचबरोबर गवती चहाचा वापर हा चहा पावडर मध्ये देखील मोठ्या प्रमाणात केला जातो त्यामुळे याला मोठी मागणी असते.
गवती चहाचा वापर कशासाठी केला जातो
- साबण बनविणे
- अत्तर बनविणे
- स्प्रे बनविणे
- शाम्पू
- औषधे
- खाण्याचे पदार्थ
- सौंदर्यप्रसाधने
- चहापावडर मध्ये
गवती चहाचे एकरी उत्पादन साधारणपणे किती निघतं?
बऱ्याचदा जर एकरी उत्पादन जास्त निघाले तर शेतकऱ्यांना चांगला फायदा देखील होत असतो. तसेच गवती चहाचे एकरी उत्पादनाबद्दल पाहिले तर गवती चहाचे एकही उत्पादने हे आठ ते दहा टन निघत असते. जर तुम्ही गवती चहा लागवड करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला याच एक रोप हे वीस ते तीस रुपयाला मिळते त्याचबरोबर चार ते पाच महिन्यानंतर तुम्ही याची कापणी करू शकता.
पाच वर्ष मिळत गवतीच्या चहाच उत्पादन
तुम्ही जर एकदा याची लागवड केली तर लगेच तुम्हाला चार ते पाच महिन्यानंतर हे विक्रीसाठी उपलब्ध होते. त्याचबरोबर एकदा लागवडीनंतर तुम्ही पाच वर्ष याच्यापासून उत्पादन घेऊ शकता. त्यामुळे याचा तुम्हाला मोठ्या प्रमाणात फायदा देखील होतो. त्यामुळे अनेक लोकांचा कल हा गवती चहा लागवडीकडे वळत असल्याचे देखील दिसत आहे.
स्वतःच्या स्वतः देखील तेल काढून कमवू शकताय बक्कळ नफा
जर तुम्ही गवती चहा लावला आणि तुम्हाला जर स्वतःच त्याचे तेल बनवून ते विकण्याची इच्छा असेल तर तुम्ही ते देखील करू शकता. यातून देखील तुम्हाला चांगला फायदा होईल यासाठी तुम्ही गवती चहाचा प्लॅन देखील तुमच्या घराशेजारी किंवा शेतामध्ये बनवू शकता. हे बनवण्यासाठी देखील जास्त खर्च आणि जागा देखील लागत नाही त्यामुळे तुम्ही ते सहजरीत्या बनवू शकता. जर तुम्ही पाचशे लिटर कॅपॅसिटी असलेला प्लॅन टाकायचा विचार केला तर त्यासाठी तुम्हाला दीड लाख रुपयापर्यंत खर्च येतो.
2) व्हॅनिला फार्मिंगचा व्यवसाय (business of vanilla farming)
बऱ्याचदा तुम्ही व्हॅनिला फ्लेवरची आईस्क्रीम खाल्ली असेल मात्र तुम्ही देखील व्हॅनिलाची शेती करून चांगला नफा कमवू शकता. अनेक शेतकरी व्हॅनिलाची शेती करून चांगले उत्पादन घेऊन चांगले पैसे कमवत असल्याचे दिसत आहे. याला कमीत कमी 35 हजार रुपये किलोचा भाव मिळतो त्यामुळे तुम्ही यातून चांगले पैसे कमवू शकता. व्हॅनिला फक्त आईस्क्रीम मध्येच नाही तर केक, चॉकलेट असे अनेक वेगवेगळे फ्लेवर बनवण्यासाठी व्हॅनिलाचा वापर केला जातो यामुळे याला मागणी देखील मोठी असते
याची विक्री कशी करणार?
जर तुम्ही व्हॅनिला लागवड केली तर याची विक्री करण्याचं तुम्हाला जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही. कारण याचे उत्पादन खूप कमी असते त्याच्यामुळे याला मागणी मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे याची विक्री तुम्ही होलसेल मार्केटमध्ये किंवा रिटेल मार्केटमध्ये करू शकता. त्याचबरोबर महत्त्वाचे म्हणजे याची विक्री तुम्ही बाहेरील देशात देखील करू शकता किंवा तुम्ही याला स्वतःचा ब्रँड म्हणून ऑनलाईन देखील विकू शकता.
3) स्टेव्हिया वनस्पतीचा व्यवसाय (Stevia plant business)
स्टेव्हिया या वनस्पतीचा वापर डायबेटीस असलेले रुग्ण जास्त करतात. त्यामुळे याला मागणी देखील मोठ्या प्रमाणात असते. याची चव गोड असते मात्र साखरेमुळे आपल्या शरीराला जे दुष्परिणाम होतात ते दुष्परिणाम यामुळे होत नाहीत. त्यामुळे अनेक जण हे घेण्यास प्राधान्य देतात. आता बरेच लोक साखरेला पर्याय म्हणून स्टेव्हियाचा आपल्या आहारामध्ये वापर करत असल्याचे देखील दिसत आहे.
स्टेव्हियाला भाव किती मिळतो?
स्टेव्हियाला मागणी जास्त आहे त्याच्यामुळे याला भाव देखील चांगला मिळत आहे. याला किलोला जवळपास 1000 ते दीड हजार रुपयांचा भाव मिळतो त्यामुळे याची शेती करून तुम्हाला चांगला फायदा होईल. स्टेव्हियाची लागवड करण्यासाठी खर्च देखील कमी होतो त्याचबरोबर याची लागवड एकदा केल्यानंतर ते झाड पाच वर्ष टिकून राहते तुम्हाला फक्त याची दर तीन ते चार महिन्यांनी पाने तोडायचे आहेत.
विक्री कुठे करणार?
याची विक्री तुम्ही प्रामुख्याने औषधी कंपन्यांमध्ये करू शकता जर तुम्हाला औषधी कंपन्यांमध्ये विक्री करायची नसेल तर तुम्ही घरच्या घरी प्लांट बनवून याची साखरेत रूपांतर करून साखरेला पर्याय म्हणून तुम्ही याची विक्री करू शकत. याचा देखील तुम्हाला चांगल्या फायदा होईल होऊन तुम्ही चांगला नफा कमवू शकता.
वरील तिन्ही वनस्पतींची लागवड करण्यासाठी मिळतें सबसिडी
आपण वरील जे तीन वनस्पती पाहिले त्या सर्व औषधी वनस्पतींच्या लागवडीबद्दल माहिती पाहिली आहे. मात्र आता शेतकऱ्यांना यामध्ये तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. या वनस्पतीला भारत सरकारच्या आयुष मंत्रालयामार्फत 30 ते 75 टक्के पर्यंत सबसिडी मिळत आहे. त्याचबरोबर नॅशनल मेडिसिनल प्लांट्स बोर्ड या बोर्डाकडून देखील तुम्हाला वेगळ्या पद्धतीने सबसिडी मिळत आहे. त्याचबरोबर काही वेगवेगळे इन्स्टिट्यूट असतील त्या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून देखील तुम्हाला ट्रेनिंग देखील मिळत आहे