तुम्हीही आहात प्रगतिशील शेतकरी ? पटकावू शकता पुरस्कार; वाचा सविस्तर माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो तुम्ही सुद्धा प्रगतिशील शेतकरी आहात ? शेतीच्या क्षेत्रातील तुमचे कार्य अतिउल्लेखनीय असेल तर तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडून पुरस्कार मिळू शकतो. दरवर्षी शेती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांना विशेष पुरस्कार देऊन गौरविले जाते. यंदाच्या वर्षी देखील कृषी विभागाकडून हे पुरस्कार देण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. कृषी पुरस्कारासाठीचा आपला परीपूर्ण प्रस्ताव कृषी विभागाच्या नजीकच्या कार्यालयात 20 ऑगस्टपर्यंत सादर करावा असंही सांगण्यात आलं आहे.

‘या’ पुरस्कारांचं वितरण

1) डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार ( 75 हजार रुपये),
2) वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार (आठ कृषी विभागांतून प्रत्येकी एक, प्रत्येकी 50 हजार रुपये)
3) जिजामाता कृषिभूषण पुरस्कार (आठ कृषी विभागांतून प्रत्येकी एक, 50 हजार रुपये)
4) कृषिभूषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार (आठ कृषी विभागांतून प्रत्येकी एक, प्रत्येकी 50 हजार रुपये)
5) युवा शेतकरी पुरस्कार (आठ कृषी विभागांतून प्रत्येकी एक, प्रत्येकी 30 हजार रुपये)
6) वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार (आठ कृषी विभागांतून प्रत्येकी एक, प्रत्येकी 30 हजार रुपये)
7) उद्यान पंडीत पुरस्कार (आठ कृषी विभागांतून प्रत्येकी एक, प्रत्येकी 25 हजार रुपये)
8) सर्वसाधारण गटासाठी प्रती जिल्हा याप्रमाणे 34 आणि आदिवासी गटासाठी प्रती विभाग 1 याप्रमाणे 6 असे एकूण 40 वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (प्रत्येकी 11 हजार रुपये)
9) आठ कृषी विभागातून प्रत्येकी 1 अधिकारी आणि कर्मचारी याप्रमाणे 8 तसेच कृषी आयुक्तालय स्तरावरुन एक असे एकूण 9 पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार

Leave a Comment

error: Content is protected !!