Agriculture Festival: बीड जिल्ह्यातील परळी वैद्यनाथ येथे राज्‍यस्‍तरीय कृषी महोत्सवाचे आयोजन!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: कृषी विभागाच्‍या पुढाकाराने 21 ते 25 ऑगस्ट 2024 (Agriculture Festival)  या कालावधीत राज्‍याचे कृषिमंत्री (Agriculture Minister) श्री. धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली बीड जिल्ह्यातील (Beed District) परळी वैद्यनाथ (Parli Vaijnath) येथे राज्‍यस्‍तरीय कृषी महोत्‍सव – 2024 (Krushi Mahotsav 2024) पार पडणार आहे. पाच दिवस चालणाऱ्या या महोत्सवात (Agriculture Festival) राज्यातील चारही कृषी विद्यापीठांनी (Agriculture University Maharashtra) केलेले संशोधन व नवीन वाणांची निर्मिती याबाबत माहिती, कृषि प्रात्यक्षिके पाहण्यास मिळणार असून शेतकऱ्यांशी थेट संवाद, विविध चर्चासत्रे आणि प्रात्यक्षिके आणि विविध योजनांची शेतकऱ्यांना (Farmers) थेट माहिती हे या महोत्सवाचे (Agriculture Festival) वैशिष्ट्य आहे. 

महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठे आणि महाराष्ट्र पशु व मत्स्य विद्यापीठाने शेती विकासासाठी विविध पिकांचे संकरित तसेच सरळ वाण, आधुनिक लागवड पद्धती, अवजारे, मृद आणि जलसंधारणाचे तंत्रज्ञान, पशुधनमधील संकरित जातींची पैदास, विविध पि‍कावरील काढणी पश्चात् प्रक्रिया, साठवणूक, विक्री व्यवस्थापन आदी बाबीवर संशोधन केलेले आहे. हे संशोधन शाश्वत शेतीसाठी अत्यंत उपयुक्त असून त्याचे पूर्णता अवलंबन होणे आवश्यक आहे. याकरिता हे तंत्रज्ञान प्रभावीपणे शेतकर्‍यांपर्यंत विविध माध्यमाद्वारा  पोहोचणे आवश्यक असल्यामुळे कृषी विभागाच्‍या पुढाकाराने हे महोत्सव (Agriculture Festival) पार पडणार आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ (परभणी), महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहूरी (अहमदनगर), डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ (अकोला), डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली (जि. रत्नागिरी) आणि महाराष्ट्र पशु व मत्स्य विद्यापीठ (नागपुर) या पाच विद्यापीठांनी केलेली संशोधने, कृषी विभागाची प्रात्यक्षिके, परिसंवाद, तंत्रज्ञान, राज्यातील शेतक-यांच्या यशोगाथा, उत्पादक ते ग्राहक थेट विक्री केंद्र, विक्रेता खरेदीदार सम्मेलन, शेतकरी सन्मान समारंभ, सेंद्रिय शेतीमाल विक्री, रानभाजी महोत्सव, कृषी अवजारे प्रदर्शन, स्वयंसहायता महिला बचत गट निर्मित पदार्थांची विक्री व प्रदर्शन असे एकत्रित सादरीकरण करणारा हा राज्यस्तरीय कृषी महोत्सव (Agriculture Festival) असून यात राज्यभरातील विविध प्रयोग ज्यामध्ये उत्पादनक्षम शेती, एकात्मिक पीक व्यवस्थापन, एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन, एकात्मिक शेती व्यवस्थापन, सेंद्रिय व नैसर्गिक शेतीची प्रात्यक्षिके (Demonstration of Organic and Natural Farming) विद्यापीठांकडून सादर केली जाणार आहेत. राज्यभरातील शेतकरी बहुसंखेने या महोत्सव (Agriculture Festival) आणि प्रदर्शनास भेट देतील, असा विश्वास कृषिमंत्री मा ना श्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला आहे.

या कृषी महोत्सवाचे आयोजन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या (VNMKV Parbhani) कार्यक्षेत्रात होत असल्याने या विद्यापीठाचा विशेष सहभाग राहणार आहे.

महोत्सवामध्ये विद्यापीठातील कृषी अभियांत्रिकी विभागाच्या दालनात विद्यापीठाने विकसित केलेले कृषी अवजारे, सिंचन पद्धती,  ड्रोन तंत्रज्ञान, अपारंपारिक ऊर्जा इत्यादी बाबतच्या तंत्रज्ञानाचा समावेश ठेवणार आहे तसेच मिल्क – सिल्क संकल्पनेला चालना देण्याच्या अनुषंगाने पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय आणि रेशीमवर उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी या विभागाच्या दालनात जिवंत नमुने व तंत्रज्ञान प्रदर्शित करण्यात येणार आहे. सेंद्रिय शेती संबंधित जिवंत देखावा उभारण्यात येणार आहे. याबरोबरच महोत्सवा लगतच्या शेतकर्‍यांच्या शेतावर ड्रोनद्वारे फवारणीचे प्रात्यक्षिक दाखवण्यात येणार आहे. तांत्रिक सत्रात विविध विषय आणि व्याख्यात्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. यामध्ये कृषी उद्योजक, प्रगतशील शेतकरी, शास्त्रज्ञ यांचा व्याख्याने आणि विविध पिकांच्या लागवड तंत्रज्ञान पासून ते विपणनापर्यंत माहिती देणाऱ्या चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. कापूस, सोयाबीन आणि इतर तेलबियांच्या प्रक्रिया उद्योग, त्यासंबंधी होणारं संशोधन, नवीन वाणांचं संशोधन, बदललेले वातावरण पर्जन्य आणि उष्णता यांच्या बदलांचा वेध घेऊन करण्यात येत असलेलं संशोधन याचेही सादरीकरण महोत्सवात करण्यात येणार आहे. शेतकर्‍यांमध्ये लोकप्रिय असलेले बायोमिक्स व बायोफर्टीलायझर विक्रीचे दालन ही उभारण्यात येणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे वन नेशन – वन हेल्थ या संकल्पनेला (माती-पाणी-पर्ण-प्राणी-मनुष्य) प्रोत्साहीत करण्याच्या हेतूने दालन उभारण्यात येणार आहे.

महोत्सवात (Agriculture Festival) कृषि विभाग, कृषि विद्यापीठे यांच्यासह शासनाचे विविध विभाग याबरोबरच कृषि तंत्रज्ञानात सहभाग असणारे विविध खासगी कंपन्‍या यांची दालने असणार आहेत. याशिवाय कृषी विज्ञान केंद्र, महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ, महाबीज, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अशा योजनांची माहिती दालने, कृषी निविष्ठा, तंत्रज्ञान, सिंचन साधने, शेतीविषयक अवजारे, मशिनरी, नवनवीन यांत्रिकीकरण, ऑटोमेटेड फार्मिंग, शेतीपूरक लघुउद्योगांसाठी विशेष दालन, राज्यभरातील विविध शेतकरी गटांनी तयार केलेली उत्पादने आदींसह महोत्सवात एकूण चारशेहून अधिक दालने असणार आहेत. 

तरी अधिकाधिक शेतकऱ्यांनी या महोत्सवास (Agriculture Festival) भेट देऊन येथील चर्चासत्रे, प्रदर्शन, प्रात्यक्षिके याचा लाभ घ्यावा, असे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ आणि कृषि विभाग (महाराष्‍ट्र राज्‍य) यांच्‍या वतीने करण्‍यात येत आहे.

error: Content is protected !!