हॅलो कृषी ऑनलाईन: सध्या रब्बी पिकांच्या पेरणीचा (Agriculture Machinery) हंगाम सुरू आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी त्यांचे शेत तयार करण्यास सुरुवात केली आहे. कल्टीवेटर (Cultivator) हे शेतकऱ्यांना शेताच्या तयारीसाठी आवश्यक असलेल्या कृषी उपकरणांपैकी एक आहे. कल्टीवेटर हे एक कृषी यंत्र आहे जे ट्रॅक्टरच्या मदतीने चालवले जाते आणि शेतात नांगरणी (Land Ploughing) करण्यासाठी वापरले जाते. या कृषी यंत्राच्या साहाय्याने शेतकरी कमी वेळात आणि श्रमात आपले शेत तयार करू शकतात. या उपकरणाद्वारे शेतकरी दोन कामे करू शकतात, एक शेत नांगरणे आणि दुसरे तण नियंत्रित (Weeding) करणे. अशाप्रकारे या यंत्राद्वारे (Agriculture Machinery) दोन कामे सहज करता येतात आणि उत्पन्न वाढवता येते. विशेष म्हणजे शेतकऱ्याच्या खरेदीवर शासनाकडून अनुदानाचा लाभही दिला जातो.
टाईन टाइप कल्टीवेटरची वैशिष्ट्ये (Feature Of Cultivator)
टाईन टाइप कल्टिव्हेटर (Tine Type Cultivator) मध्ये 9 ते 13 टायन्स असतात. त्याच्या मदतीने जमीन नांगरून शेतीसाठी तयार करता येते. कल्टिवेटरची (Agriculture Machinery) मुख्य वैशिष्ट्ये किंवा उपयोग खालीलप्रमाणे आहेत.
- टाईन टाइप कल्टिव्हेटरचा वापर मुख्यतः कोरड्या आणि दमट जमिनीवर शेतात पेरणीसाठी केला जातो.
- या कृषी अवजारात लोखंडी चौकटीला लहान धारदार कुंडले जोडलेले असतात. याच्या मदतीने ओळींमध्ये ठराविक अंतरावर पिकांची पेरणी केली असेल तर तण काढणे व खुरपणी करण्याचे काम करता येते.
- नांगरलेल्या शेतात कल्टिवेटरचा (Agriculture Machinery) वापर केल्याने शेतातील गवत नष्ट होऊन माती भुसभुशीत होते आणि जमिनीखाली गाडलेले मातीचे गड्डे वर येऊन तुटतात.
- कल्टिव्हेटरचा वापर मळणीसाठी सुद्धा केला जातो.
कल्टिव्हेटर चालवण्यासाठी किती एचपी ट्रॅक्टर लागेल?
ट्रॅक्टरला जोडून कल्टिवेटर चालवले जाते. ते चालवण्यासाठी 35 हॉर्स पॉवर (HP) किंवा त्याहून अधिक हॉर्स पॉवरचा ट्रॅक्टर लागतो. हे 35 HP पेक्षा जास्त HP च्या ट्रॅक्टरने शेतात सहज चालवता येते.
कल्टीवेटरवर किती सबसिडी मिळते? (Subsidy On Cultivator)
केंद्र सरकारद्वारे कृषी यांत्रिकीकरण (Agriculture Machinery) योजनेअंतर्गत उप अभियान राबविण्यात येत आहे. याअंतर्गत शेतकऱ्यांना शेतीमालावर अनुदानाचा लाभ दिला जातो. या योजनेंतर्गत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्प, अत्यल्प भूधारक आणि महिला शेतकऱ्यांना कृषी उपकरणांच्या किमतीवर 50 टक्के अनुदान दिले जाते. योजनेअंतर्गत इतर प्रवर्गातील शेतकऱ्यांना 40 टक्के अनुदान दिले जाते. याशिवाय काही राज्य सरकारे विविध योजनांतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना कृषी उपकरणांवर 40 ते 80 टक्के अनुदान देतात. शासनाकडून वेळोवेळी कृषी उपकरणांच्या अनुदानासाठी अर्ज मागविण्यात येतात. यामध्ये अर्ज करून शेतकरी शासकीय अनुदानाचा लाभ घेऊ शकतात. लॉटरीद्वारे कृषी उपकरणांवरील अनुदानासाठी शेतकऱ्यांची निवड केली जाते.
कल्टीव्हेटरची किंमत (Cultivator Price)
कल्टीव्हेटरची (Agriculture Machinery) किंमत त्यामध्ये स्थापित केलेल्या टायन्सची संख्या आणि त्याची वैशिष्ट्ये यावर अवलंबून असते. जर आपण त्याच्या किंमतीबद्दल बोललो तर त्याची किंमत 12999 रुपयांपासून सुरू होते आणि 1.65 लाख पर्यंत जाते.