Agriculture Management : गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने उघडीप दिली आहे. मोठ्या प्रमाणावर ऊन पडत आहे. त्यामुळे पिके सुकून जात आहेत. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झालेला आहे. अशा वेळी शेतकऱ्यांनी पावसाच्या खंड काळात पिकाचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला याबाबत काही महतवाच्या टिप्स देणार आहोत. तुम्ही याप्रमाणे पीक नियोजन केले तर नक्कीच तुमचे पीक वाचू शकते.
शेतकरी असाल तर हे मोबाईल अँप तुमच्याकडे पाहिजेच
शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आधुनिक पद्धतीने शेती करण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे गुगल प्ले स्टोअरवरील Hello Krushi हे मोबाईल अँप असणे खूप गरजेचे आहे. या अँपवर शेती विषयक बातम्या, सरकारी योजना यांची माहिती मिळतेच पण सोबत जमीन मोजणी, सातबारा डाउनलोड करणे, भूनकाशा, हवामान अंदाज आदी सेवाही मोफत देण्यात येतात. तसेच आपल्या गावाच्या जवळील सर्व रोपवाटिका, खत दुकानदार यांच्याशी एका क्लिकवर संपर्क करण्याची सुविधा येथे देण्यात आली आहे. तेव्हा आजच गुगल प्ले स्टोअरला जाऊन Hello Krushi सर्च करा आणि १ लाखाहून अधिक शेतकरी वापरत असलेले हॅलो कृषी अँप डाउनलोड करा.
हवामान विभागाने १९ ऑगस्ट पासून २४ तारखेपर्यंत राज्यातील काही भागात पाऊस पडेल असा अंदाज सांगितला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याने विदर्भ, मराठवाड्यात पाऊसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र अद्याप पुरेसा पाऊस न झाल्याने शेतकरी चिंतेत आहे. अनेकांनी तर उभ्या पिकात रोटाव्हेटर फिरवून आता रब्बीची तयारी सुरु केली आहे.
पावसाचा खंड पडलेला असताना कसे करावे पीक नियोजन?
- पिकाची उगवण होऊन वाढीच्या अवस्थेत असलेल्या पिकांमध्ये हलकी डवरणी करावी. जेणेकरून बाष्पीभवन कमी होऊन जमिनीमध्ये जास्त काळ ओलावा टिकण्यास मदत होईल.
- ज्या ठिकाणी सिंचनाची सोय नाही, तेथे लहान क्षेत्रावर पाठीवरील पंपाचे नोझल ढिले करून सकाळी व संध्याकाळी पिकांच्या ओळीत पाण्याची फवारणी करावी. त्यामुळे पिकाला काही प्रमाणात ओलावा मिळेल.
- सिंचनाची सोय असलेल्या ठिकाणी स्प्रिंक्लरने सकाळी किंवा संध्याकाळी हलके ओलित करावे.
- तसेच पिकांवर २ ते ३ टक्के डायअमोनियम फॉस्फेटची (डी.ए.पी.) किंवा पोटॅशियम नायट्रेटची (१३:०:४५) १ टक्के फवारणी करावी.