Agri Technology : शेतकऱ्यांनो, ‘हे’ कृषी उपकरण ठरतंय फायदेशीर, विजेचं आणि डिझेलच टेन्शन नाही; जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Agri Technology : देशभरातील शेतकरी शेतीची कामे करण्यासाठी अनेक प्रकारच्या यंत्रांचा वापर करतात, परंतु ग्रामीण भागात राहणार्‍या शेतकर्‍यांना महागडी आणि मोठी कृषी उपकरणे खरेदी करता येत नाहीत, त्यामुळे ते ही मशीन भाड्याने घेतात. मात्र भारताच्या बाजारपेठेत अशी अनेक कृषी उपकरणे आहेत जी दिसायला खूपच छोटी आहेत पण ती यंत्रासारखीच काम करतात आणि त्यांची किंमतही खूप कमी आहे. ज्याच्या वापर तुम्ही करू शकता. जर तुम्ही पीक काढणीसाठी कृषी यंत्र खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर कदाचित हे कापणी उपकरण तुमच्यासाठी खूप चांगले आहे, जे तुम्ही हाताने चालवू शकता, हे उपकरण पीक कापणीसाठी सर्वोत्तम उपकरण आहे. जाऊन घेऊयात या यंत्राबद्दल माहिती.

सर्वात कमी किंमतीत शेती उपकरणे विकत घेण्यासाठी इथे क्लिक करून App डाऊनलोड करा

कापणी यंत्र

पीक काढणीसाठी वापरण्यात येणारे हे कृषी साधन पातळ कुर्‍हाडीसारखे दिसते, त्याचे नाव आहे स्कायथ टूल. त्याच्या समोर एक टोकदार साधन जोडलेले आहे, त्याला धरण्यासाठी एक लांब लाकडी काठी जोडलेली आहे. आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी हँडलचा वापर करण्यात आला आहे. यामुळे तुमच्या शेतातील कामे झटपट होतील.

या उपकरणाच्या मदतीने तुम्ही सर्व पिकांची कापणी करू शकता, शेतकरी ते वीज आणि डिझेलशिवाय वापरू शकतात, ते चालवण्यासाठी कोणतेही कष्ट करण्याची गरज नाही, या उपकरणाच्या साहाय्याने शेतकरी 2 बिघा जमीन सुमारे 7-8 तासात सहज काढू शकतात. शेतकरी गहू, बार्ली आणि हिरवा मका आणि चारा पिकांची या उपकरणाने कापणी करू शकतात. याशिवाय, त्याच्या मदतीने, तुम्ही तुमच्या गरजेनुसार इतर शेतीची कामे पूर्ण करू शकाल.

यंत्राची किंमत किती?

भारतीय बाजारपेठेतील या उपकरणांची किंमत शेतकर्‍यांना अत्यंत परवडणारी आहे. त्यामुळे तुम्ही हे उपकरण खरेदी करून तुमच्या शेतीतील कामे व्यवस्थितपणे करू शकता. 1500 ते 7500 रुपयांपर्यंत हे यंत्र बाजारामध्ये उपलब्ध आहे. त्याचबरोबर हॅलो कृषी हे अँप जर तुम्ही प्ले स्टोअरवरून इंटेल केले तर यामध्ये शेतकरी दुकान या ऑप्शनमध्ये तुम्हाला हे यंत्र सहज मिळून जाईल

error: Content is protected !!