Agriculture News : सध्या राज्याच्या विविध भागांमध्ये पाऊस खूप कमी प्रमाणात पडताना दिसत आहे. यामध्ये मराठवाड्यामध्ये तर पावसाने चांगली दडी मारली आहे. यामुळे या ठिकाणचे शेतकरी चिंतेत आहेत. पावसामुळे मराठवाड्यातील खरिपाची (Kharif) उत्पादन क्षमता सरासरी 35 ते 40 टक्क्यांपर्यंत घटण्याचा अंदाज आहे. पुढच्या आठवड्यापर्यंत पाऊस झाला नाही तर 35 लाख हेक्टरवरील संपूर्ण खरीप धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या ठिकाणचे शेतकरी चिंतेत आहेत. (Agriculture News)
शेतकरी पाहतायेतं पावसाची वाट
जुलै महिना सुरू झाल्यानंतर मराठवाड्यामध्ये काही प्रमाणात पाऊस झाला होता. या पावसाच्या जोरावर सर्व शेतकऱ्यांनी खरीपाची पेरणी केली होती. मात्र जुलै महिना संपताच पावसाने दडी मारली. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात पावसाने चांगलीच उघडीप दिली. कडाक्याच्या उन्हामुळे उगवून आलेले पीक सुकू लागले. त्यामुळे मराठवाड्यामध्ये पाऊस पडला नाही तर आगामी काळात शेती पीकाला पाणी कसे द्यावे असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. जर मोठा पाऊस झाला नाही तर शेतातील पिके जळून जातील असे देखील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे शेतकरी मुसळधार पावसाची वाट पाहत आहेत. छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नजरा आता पावसाकडे लागल्या आहेत.
मराठवाड्यातील खरीप हंगामातील पीक पेरणीचे क्षेत्र
- छत्रपती संभाजीनगर – 68 लाख 4 हजार 716
- लातूर – 5 लाख 99 हजार 456
- जालना – 6 लाख 19 हजार 695
- बीड – 7 लाख 85 हजार 786
- परभणी – 5 लाख 34 हजार 900
- हिंगोली – 36 हजार 905
- धाराशिव – 5 लाख 4 हजार 735
- नांदेड – 7 लाख 66 हजार 809
१९ आणि २० ऑगस्ट रोजी मराठवाड्यात पाऊस
हवामान विभागाकडून या आठवड्यामध्ये पाऊस होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. हवामान विभागाचा हा अंदाज खरा ठरत असल्याचे दिसत आहे. राज्याच्या अनेक ठिकाणी पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले असून काही ठिकाणी हलक्या सरी बरसत आहेत. तसेच 19 ते 20 ऑगस्ट रोजी देखील मराठवाड्यामध्ये चांगला पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.