राज्यात अवकाळीची ये जा सुरूच; शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घेताना काय खबरदारी घ्यावी?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन । मागील काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाची ये जा सुरूच आहे. वादळी वारे अन काही प्रमाणात झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अजूनही पुढील काही दिवस राज्यात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यापार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी अशा वातावरणात आपल्या पिकांची काळजी कशी घ्यावी याबाबत आम्ही या लेखात माहिती देणार आहोत.

पीक व्‍यवस्‍थापन
कमाल तापमानात झालेल्या वाढीमूळे उन्हाळी भुईमूग पिकास आवश्यकतेनूसार व जमिनीतील ओलाव्यानूसार पाणी द्यावे. पाणी शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी द्यावे. पाणी देण्यासाठी सूक्ष्म सिंचन पध्दतीचा (तूषार किंवा ठिबक) वापर करावा. भुईमूग पिकात आऱ्या सुटल्या नंतर अंतर मशागत करू नये. सध्या हळदीची काढणी, हळद उकडणे, वाळवणे, पॉलिश करणे ही कामे सुरू आहेत. तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज लक्षात घेता हळदीची उघडयावर साठवण करू नये.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन
जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी व जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी केळी फळझाडाच्या आळयात आच्छादन करावे. बागेस सकाळी किंवा संध्याकाळी पाणी द्यावे पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन पध्दतीचा अवलंब करावा. नविन लागवड केलेल्या फळबागेमध्ये रोपांना शेडनेटच्या साहाय्याने सावली करावी जेणेकरून लहान रोपांचे प्रखर उन्हापासून संरक्षण होईल. तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज लक्षात घेता काढणीस तयार असलेल्या केळीच्या घडांची काढणी लवकरात लवकर करून घ्यावी. बहुतांश आंबा बाग काढणी पूर्व अवस्थेत असुन बागेस पाणी देण्यात येऊ नये.

वादळी वारा व पाऊस यामूळे फळबागेत पडलेली फळे गोळा करून नष्ट करावीत. तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज लक्षात घेता काढणी राहिलेल्या द्राक्ष फळांची काढणी करून घ्यावी. द्राक्ष बागेमध्‍ये एप्रिल छाटणी ही घड निर्मितीसाठी केली जाते. द्राक्ष बागेत एप्रिल छाटणीची पुर्व तयारी करून घ्‍यावी. सर्व नुकसानग्रस्त फळे काढून, तुटलेल्या आणि चिरलेल्या फांद्या छाटाव्यात आणि बागेबाहेर खड्डयामध्ये कुजण्यासाठी टाकाव्यात. छाटलेल्या फांद्यांवर व खोडावर 10 % बोर्डो पेस्ट लावावी.

त्यानंतर 1% बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी. खतांचा हलका डोस देऊन बागेला विश्रांती अवस्थेत ठेवावे व पुढच्या बहाराची तयारी करावी. गारपीट व पावसामूळे ईजा झालेल्या फळांची काढणी करावी आणि फळे कुजलेली दिसत नसल्यास त्यांची तत्काळ विक्री करावी. चिरलेली व नुकसानग्रस्त फळे एकत्रित करून कंपोस्ट खड्डयात टाकावीत. फळांच्या काढणीपूर्वी बोरीक ॲसिड 2 ग्रॅम प्रति लिटरची संरक्षणात्मक फवारणी घ्यावी जेणेकरून ईजा झालेल्या फळांमध्ये कुज टाळण्यास मदत होईल.

भाजीपाला
तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज लक्षात घेता काढणीस तयार आसलेल्या भाजीपाला पिकांची तसेच टरबूज, खरबूज इत्यादी पिकांची काढणी करावी. कमाल तापमानात झालेल्या वाढीमूळे भाजीपाला पिकास आवश्यकतेनूसार व जमिनीतील ओलाव्यानूसार पाणी द्यावे. पाणी शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी द्यावे. पाणी देण्यासाठी सूक्ष्म सिंचन पध्दतीचा (तूषार किंवा ठिबक) वापर करावा.

फुलशेती
तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज लक्षात घेता काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी करून बाजार पेठेत पाठवावी. कमाल तापमानात झालेल्या वाढीमूळे भाजीपाला पिकास आवश्यकतेनूसार व जमिनीतील ओलाव्यानूसार पाणी द्यावे.

चारा पीके
तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज लक्षात घेता काढणी केलेल्‍या ज्‍वारीचा कडबा पावसात भिजणार नाही याची दक्षता घ्‍यावी. कारण पावसात भिजल्‍यास त्‍याची प्रत खालावून साठवण क्षमता कमी होते व भिजलेला कडबा जनावरे खात नाहीत.

पशुधन व्यवस्थापन
कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमूळे आपल्या पशुंना उन्हामध्ये बांधु नका (निदान तिव्र उन्हाच्या कालावधीमध्ये त्यांना झाडाखाली/सावलीमध्ये किंवा शेड/गोठ्यामध्येच बांधणे चांगले). पशुंना शक्यतो थंड/स्वच्छ/मुबलक पाणी दोन-तिन वेळेस पाजावे. पाण्यामुळे पशुंच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी (डीहायड्रोजन) होणार नाही. जमल्यास पाण्यामधून क्षार द्यावेत, 5 लिटर पाण्यामध्ये चिमुटभर गुळ (25 ग्रॅम), थोडे मिठ (5-10 ग्रॅम) आणि 5 ग्रॅम क्षार मिश्रण दिल्यास उत्तम, मात्र नजीकच्या पशुवैद्यकाचा सल्ला घेऊनच व्यवस्थापन करावे. अति उष्ण काळामध्ये जनावरांच्या पाठीवर पोते टाकून ते पाण्याने भिजवून ठेवावे.

तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्यामूळे जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू नये. निवा-याच्‍या ठिकाणी बांधावे व पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्‍यावी. पशूधनास खुले पाणी, तलाव किंवा नदीपासून दूर ठेवावे, ट्रक्टर आणि इतर धातूंच्या शेती अवजारांपासून दूर ठेवावे व पशुधनास झाडाखाली जमा होऊ देऊ नये. तसेच पाऊस चालू होण्‍याच्‍या वेळी झाडाच्‍या आडोशाला थांबु नये.

सामुदायिक विज्ञान
स्वस्थ जीवनासाठी आश्यक बाबी : दररोज संतुलीत आहार घ्या. दिवसभरात 8 ते 10 ग्लास पाणी प्या. आहारात साखर आणि मीठाचा वापर कमी करा. तेल आणि मसालेदार पार्थांचा वापर कमी करा. सकाळची न्याहरी करण्यास कधीच टाळाटाळ करु नका. जेवणाच्या वेळा नियमितपणे पाळा.

कृषि अभियांत्रिकी
रब्बी पिकांच कापणी झाल्यानंतर शेतात नांगरणी करून घ्यावी. शेतकऱ्यांनी आपल्या शेतामधील मातीचे माती परिक्षण करून घ्यावे

error: Content is protected !!