Agriculture News : चालू खरीप हंगामातील पीक स्पर्धेमध्ये सर्व शेतकऱ्यांनी सहभागी व्हावं असं आव्हान पुणे कृषी विभागाने शेतकऱ्यांना केल आहे. कृषी विभागामार्फत चालू खरीप हंगामात सर्वसाधारण आणि आदिवासी गटासाठी बाजरी, ज्वारी, भात, नाचणी, मका, उडीद, मूग, तू,र सोयाबीन, सूर्यफूल आणि भुईमूग या पिकांसाठी पीक स्पर्धेच आयोजन केल आहे. त्यामुळे यामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपला सहभाग नोंदवावा असं आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी 31 ऑगस्ट 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहेत
या पीक स्पर्धेचा उद्देश असा की, जे प्रयोगशील शेतकरी आहे त्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देण्यासाठी पीक स्पर्धा राबविण्यात येत असल्याची माहिती पुणे कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या पीक स्पर्धेत सहभागी व्हावे असे देखील आव्हान कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.
स्पर्धेसाठी अटी आणि शर्ती काय?
कोणतीही स्पर्धा घ्यायची म्हटली तरी त्यासाठी अटी आणि शर्ती या असतातच. या स्पर्धेसाठी देखील काही अटी आणि शर्ती ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये सर्वसाधारण गटासाठी तीनशे रुपये आणि आदिवासी गटासाठी 150 रुपये प्रमाणे प्रत्येक पिकासाठी स्वतंत्र प्रवेश शुल्क असणार आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या शेतकऱ्याला या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आहे त्या शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावावर जमीन असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर तो स्वतः जमीन कसंत असावा. एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकांसाठी स्पर्धेत सहभाग घेता येणार असल्याची माहिती देखील कृषी विभागांन दिली आहे.
पीक स्पर्धा तालुकास्तरावर आयोजित करण्यात येणार असून या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेल्या शेतकऱ्यांची आलेली उत्पादकता आधारभूत धरून राज्य जिल्हा आणि तालुका स्तरावरील स्पर्धेसाठी विजेत्या शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट आहे. त्यामुळे त्या तारखेच्या आत तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे. अर्जासाठी तुम्हाला काही आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे. यामध्ये शेतकऱ्यांचा ७/१२ ८अ चा उतारा, आदिवासी असल्यास जात प्रमाणपत्र, बँक पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स. त्याचबरोबर स्पर्धेसाठी शेतकऱ्यांनी संबंधित सातबारावरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेल्या नकाशा इत्यादी कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. या योजनेबाबतची अधिकची माहिती घेण्यासाठी तुम्ही https://krishi.maharashtra.gov.in या कृषी विभागाच्या संकेतस्थळावर भेट देऊ शकता किंवा संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संबंध संपर्क साधून तुम्ही याबाबत अधिकची माहिती घेऊ शकता.
विजेत्या शेतकऱ्याला बक्षीस किती मिळणार?
यामध्ये तालुका पातळीवर प्रथम क्रमांकासाठी 5000 द्वितीय क्रमांकासाठी 3000 तर तृतीय क्रमांकासाठी दोन हजार रुपये बक्षीस मिळणार आहे. त्याचबरोबर जिल्हा पातळीवर प्रथम क्रमांकासाठी 10 हजार द्वितीय क्रमांकासाठी 7000 आणि तृतीय क्रमांकासाठी पाच हजार रुपये मिळणार आहे. त्याचबरोबर राज्य पातळीवर प्रथम क्रमांकास 50,000 द्वितीय क्रमांकास 40,000 त्याचबरोबर तृतीय क्रमांकास 30,000 रुपये बक्षीस मिळणार आहे.