Agriculture News : ‘या’ औषधी वनस्पतींची लागवड करून कमावू शकताय लाखो रुपये; वाचा सविस्तर माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Agriculture News : जर तुम्हीही पारंपारिक शेती करत असाल आणि या बदलत्या ऋतूत तुम्हाला औषधी वनस्पतींची लागवड करायची असेल, तर तुमच्यासाठी ही एक महत्त्वाची संधी आहे. बाजारात औषधी वनस्पतींना मोठी मागणी आहे. या औषधी पिकांची खास गोष्ट म्हणजे खर्च त्यांची लागवड कमी आणि नफा जास्त असतो. त्याची लागवड केल्यास चांगला नफा कमावता येतो. चला तर जाणून घेऊया काही औषधी वनस्पतींबद्दल ज्यांच्या लागवडीतून भरपूर नफा मिळू शकतो

लेमनग्रासची लागवड (Cultivation of lemongrass)

याच्या लागवडीसाठी जास्त मेहनत घ्यावी लागत नाही. याची लागवड तुम्ही पडीक जमिनीमध्ये देखील करू शकता. यासाठी पाणी व्यवस्थापनाचे देखील जास्त टेन्सिव नाही तुम्ही वर्षातून ५ ते ६ वेळा पाणी देऊ शकता. लेमनग्रास एकदा लागवडीनंतर ते तुम्हाला कायम पीक देत राहील. पुढील 5 ते 6 वर्षे भारतीय बाजारात यापासून बनवलेल्या तेलाला मोठी मागणी असते. याच्या तेलाची 1200 रुपये प्रति लीटरपर्यंत विक्री केली जाते.

शतावरी शेती (Asparagus farming)

सध्या अनेकजण शतावरीची लागवड करून चांगला नफा मिळवत असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक साधी औषधे बनवण्यासाठी याचा वापर केला जातो. या वनस्पतीच्या डहाळ्या आणि पानांचा उपयोग औषधे बनवण्यासाठी केला जातो. जर तुम्ही तुमच्या एक एकर शेतात शतावरीची लागवड केली तर तुम्ही सहज लाखो रुपये कमावू शकता. त्यामुळे योग्य नियोजनाने शेती करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.

अश्वगंधा लागवड (Cultivation of Ashwagandha)

अश्वगंधा ही एक औषधी वनस्पती आहे, जिचा उपयोग विविध प्रकारची औषधे बनवण्यासाठी केला जातो. भारतीय वैद्यकशास्त्रात तिचा अनेक शतकांपासून वापर केला जात आहे. या वनस्पतीची मुळं, देठ आणि पाने वापरून अनेक प्रकारची औषधे बनवली जातात. लागवड केल्यानंतर या पिकाला तयार होण्यास 6 ते 8 महिने लागतात. सध्या बाजारात अश्वगंधाचा भाव 30 ते 35 हजार रुपये प्रतिक्विंटल आहे.

error: Content is protected !!