Agriculture News : सध्या आपल्याकडील शेतकरी शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करून कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न करतात. ज्या उत्पादनाला कमी खर्च येतो आणि जास्त मिळतो असे उत्पादन घेण्यास शेतकरी प्राधान्य देत असल्याचे पाहायला मिळत आहे. आज देखील आम्ही तुम्हाला अशाच एका व्यवसायाबद्दल सांगणार आहोत ज्यामध्ये वीस पट फायदा मिळू शकतो. आम्ही सांगत असलेला व्यवसाय दुसरा तिसरा कोणता नसून लेमनग्रास हा व्यवसाय आहे. यामध्ये तुम्ही कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त नफा मिळू शकतात.
लेमन ग्रास एक औषधी वनस्पती असून यापासून सुगंधी प्रॉडक्ट तयार केले जातात. त्यापासून औषध देखील तयार केले जातात. औषधी गुणधर्म असल्याने सहसा कोणताही रोग यामुळे होत नाही. लेमन ग्रासचे कोणतेही नुकसान होत नाही याला बाजारात मोठी मागणी असते. त्यामुळे यामधून शेतकरी चांगला नफा देखील कमवू शकतात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, मन की बात या कार्यक्रमांमध्ये झारखंड मधील विष्णुपुरी येथे लेमन ग्रासची शेती करणाऱ्या ३० लोकांच्या समूहाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले होते.
20 हजार रुपयात सुरू करा व्यवसाय
तुम्हाला जर लेमन ग्रासची लागवड करायची असेल तर त्यासाठी बागायती जमीन असणे आवश्यक नाही. तुम्ही पडीक जमिनीत देखील लेमन ग्रासची लागवड करू शकता. यासाठी जमीन सुपीक करण्याची देखील गरज पडत नाही त्यामुळे त्या ठिकाणचा देखील तुमचा खर्च वाचतो. अवघा 20 हजार रुपये खर्च करून तुम्ही लेमन ग्रासची शेती करू शकता. यासाठी एका एकरचा खर्च वीस हजार रुपये येतो. त्याचबरोबर सहा वर्षात यापासून चार ते पाच लाख रुपयांचा नफा मिळतो, लेमन ग्रासची एकदा लागवड केल्यानंतर चार ते सहा वेळा उत्पादन काढता येते. त्यामुळे यामधून शेतकरी चांगला पैसा कमवू शकतात.
बाजारात मोठी मागणी
लेमन ग्रास औषधी वनस्पती असल्याने त्याला बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी असते. लेमन ग्रास पहिल्यांदा कापल्यानंतर त्याच्या एका हेक्टर मधून जवळपास 25 किलो तेल तयार करण्यात येते. त्यानंतर दुसऱ्यांदा कापल्यानंतर 70 लिटर तेल काढता येते. प्रत्येक वेळी कापताना उत्पादन वाढत असते. त्याचबरोबर याच्या तेलाला बाजारात मोठी मागणी असून हे तेल 1200 ते 1500 रुपये लिटर प्रमाणे विकले जाते. त्यामुळे तुम्ही जर याचे योग्य नियोजन आणि शेती केली तर तुम्हाला देखील यामधून चांगला फायदा मिळू शकतो.