शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट होणार कृषी अभ्यासक्रम; अब्दुल सत्तारांचा शालेय मंत्र्यांकडे अहवाल जारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात शिक्षण व्यवस्थेत क्रीडा, व्यक्तिमत्व विकास, सामान्य ज्ञान, गणित, इतिहास, भूगोल या विषयाचे अध्ययन विद्यार्थी करत असतात. मात्र भारतात पारंपरिक व्यवसाय म्हणून शेतीला ओळखले जाते. मात्र शेतीबाबत शालेय शिक्षण व्यवस्थेत शेतीविषयक कोणताही अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना शिकवला जात नाही. तो शिकवला जावा यासाठी राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी यासंदर्भातील अहवाल सत्तार यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे (ता.२५) मंगळवार या दिवशी सुपूर्त केला.

कृषी विषयाचा समावेश शालेय शिक्षणाच्या अभ्यासक्रमात समावेश करण्याचा प्राथमिक अहवाल हा शिक्षण विभागाने स्वीकारला आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा शेतीविषयक अभ्यास होईल. याचा उपयोग विद्यार्थ्यांना नक्कीच होईल. शेतीकडे विद्यार्थ्यांचा कल वाढेल. तसेच शेती व शेती व्यवसाय करणाऱ्यांबद्दल जाणीव व संवेदनशीलता निर्माण होईल, असा विश्वास यावेळी सत्तार यांनी व्यक्त केला.

शालेय विद्यार्थ्यांना जर शेतीविषयक ज्ञान मिळाले तर पुढील जीवनात त्यांना त्यांचे महत्व समजण्यास उपयुक्त ठरेल. शिक्षणविषयक आराखडा तयार करताना पहिली ते पाचवी, सहावी ते आठवी, नववी आणि दहावी अशा स्वरूपात शेतीविषयक अभ्यासक्रम ठेवावा. कृषी प्रशिक्षणासाठी जी काही मदत आणि साहित्य लागेल ती पूर्ण करण्याची भूमिका सत्तार यांनी सांगितली. शेती अभ्यासक्रमातून शेती उपाययोजना, व्यवसाय संधी, शेतीचे महत्व, शेतीविषयक जाणीव अशा अनेक बाबींकडे लक्ष केंद्रित करून विद्यार्थ्यांचं सर्वांगीण विकास साधता येऊ शकतो. असे राज्य कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

error: Content is protected !!