Agriculture Technology : 5 मिनिटांत होणार गव्हाची कापणी; शेतकऱ्यानं लावला 1 नंबर शोध; पहा देसी जुगाड फॉर्म्युला (Video)

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन (Agriculture Technology) | भारतात शेती व्यवसायाला अधिक मागणी आणि महत्त्व प्राप्त झालं आहे. सध्या गहू काढणीचा (Wheat Harvesting) हंगाम सुरू झाला आहे. यामुळे बरेच शेतकरी या हंगामाकडे वळले आहेत. शेतकरी बऱ्याचदा अनेक मशिनची (Agriculture Machinery) मदत घेतात. सोशल मीडियावर असाच एक गहू काढणीचा व्हिडिओ पाहायला मिळत आहे. त्या व्हिडिओत एक माणूस अतिशय आरामात गव्हाची कापणी करताना दिसत आहे. व्हिडीओ पाहून असे केले तर आपणही ५ मिनिटांत गहू कापणी करू शकतो असे वाटत आहे. सोशल मीडिया वापरकर्ते त्या व्यक्तीचे कौतुक करण्यात काही कसर सोडत नाहीत.

शेती अवजारांवर सरकारी अनुदान मिळवण्यासाठी इथे क्लिक करा

व्हायरल व्हिडिओत आपल्या अनोख्या जुगाड पद्धतीने एक शेतकरी क्षणार्धात गहू काढताना पहायला मिळतेय. शेतकरी देसी स्टाईलने खूप वेगाने एका फटक्यात गहू कापताना पाहून अनेकांना आश्चर्य वाटत आहे. काही लोक ट्रॅक्टरला मशीन बांधून गव्हाची कापणी करतात. तर काहीजण हार्वेस्टर मशीनने गहू कापतात. मात्र तुम्ही जर गहू कापण्याचा जुगाड फॉलोअ केला तर कसे राहील याबाबत आम्ही इथे माहिती देणार आहोत.

तुम्हाला शेतकऱ्यांनी बनवलेले असे जुगाड विकत घ्यायचे आहेत का?

शेतकरी मित्रांनो आपल्या शेजारपाजारील गावातील काही शेतकरी खूप भन्नाट जुगाड बनवत असतात. शेतकऱ्यांनी बनवलेलले असे जुगाड आपले अंगमेहनत आणि वेळ वाचवू शकतात. तसेच मोठ्या अवजारांपेक्षा यांची किंमत खूपच कमी असल्याने ते सर्वांना परवडतात. तुम्हाला अशाप्रकारची कोणती उपकरणे विकत घ्यायची असल्यास गुगल प्ले स्टोअरला जाऊन Hello Krushi नावाचे मोबाईल अँप इंस्टाल करून घ्या. इथे शेतकरी दुकान या विभागात तुम्हाला खत दुकानदार, रोपवाटिका, जमीन खरेदी विक्री, जनावरे खरेदी विक्री अशा अनेक सुविधा मोफत उपलब्ध आहेत. आजच Hello Krushi हे अँप डाउनलोड करून घ्या.

काय आहे 5 मिनिटांत गहू कापणीचा जुगाड (Agriculture Technology)

शेतकरी मित्रांनो आपण नेहमी काहीनाकाही प्रयोग करायला हवेत. सोशल मीडियात बाहेरील देशांमधील तसेच चीनमधील काही शेतकरी शेतकऱ्यांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यांचे जुगाड पाहून अनेकदा थक्क व्हायला होतं. आपल्याकडे महाराष्ट्रातही टॅलेंटची कमी नाही. मात्र आपण तरीसुद्धा नवनवीन प्रयोग करण्यात मागे आहोत. आता याच शेतकऱ्याचे पहिले तर त्याने अतिशय सोपी पद्धत वापरून गहू काढणी करण्याचा जुगाड शोधला आहे.

एक गोलाकार जाळी असलेले गॅझेट त्याने बनवले आहे. त्या गॅझेटच्या टोकाला धार असलेले ब्लेड लावलेले आहे. गव्हामधून तो जेव्हा हे वेगाने फिरवतोय तेव्हा ब्लेडच्या मदतीने गहू कट होतोय अन गॅझेटला असलेल्या जाळीत पडत आहे. यानंतर लगेच शेजारीच तो शेतकरी ती जाळी उलटी करून काढलेला गहू जमिनीवर टाकत आहे. अशा प्रकारे आपण गहू काढले तर आपण खूप कमी वेळात गहू काढणी करू शकतो हे नक्की. Agriculture Technology

१ लाखांहून अधिक व्हिडिओला व्ह्यूज

हा व्हिडिओ ट्विटरद्वारे @TansuYegen या आयडीद्वारे शेअर करण्यात आला. याच व्हिडिओला १ लाखांहून अधिक व्ह्यूज पहायला मिळत होते. यामुळे या व्हिडिओवर सकारात्मक कॉमेंट्सचा वर्षाव होऊ लागला. काही लोकं ट्रॅक्टरला गहू बांधून गव्हाची काढणी करताना दिसत आहेत. या व्हिडिओतला देसी जुगाड पाहून अधिक पसंती या व्हिडिओला दिली जाऊ लागली आहे. आता काही शेतकरी या टिप्स फॉलो करायला सुरुवात करतील.

error: Content is protected !!