Agriculture Technology : तरुण शेतकऱ्याचा भन्नाट जुगाड; शारीरिक मेहनत न करता पिकांना करता येणार फवारणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : भारत देश हा कृषिप्रधान देश आहे. हे आपण लहानपणापासून अभ्यासात शिकत आलो आहोत. भारतात अधिकाधिक पारंपरिक (Traditional Farming) शेती केली जाते. परंतु बदलत्या काळानुसार शेतकरी आता यांत्रिकीकरणाकडे (Agriculture Technology) वळला आहे. एवढंच नाही तर महाराष्ट्रातील शेती विकसित भागातही यांत्रिकीकरणाला वाव देण्याचे काम आता स्वतः शेतकरी करत आहेत. यामुळे मनुष्यबळ, खर्च, वेळ वाचत असून याचा परिणाम आर्थिकदृष्ट्या शेतकऱ्यांना फायदेशीर ठरतो. यामुळे आता बीड जिल्ह्यातील गेवराई या तालुक्यातील शेतकरी बाळासाहेब शिंदे (Balasaheb shinde) यांनी तंत्रज्ञानाचा जुगाड करत अगदी कमी वेळात शेतीची फवारणी कशी करता येईल हे जुगाड तंत्र विकसित केलं आहे.

शेती अवजारांवर अनुदान मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

बदलत्या काळानुसार बदल होणे हे नैसर्गिक आहे. यामुळे आता शेती क्षेत्रातही पारंपरिक शेतीला जोपासत यांत्रिकीकरणाला सोबत ठेऊन बीड जिल्ह्यातील बाळासाहेब शिंदे या शेतकऱ्याने कमाल केली आहे. पिकाला औषध फवारणीसाठी पंपाची आवश्यकता असते. बऱ्याचदा शेतीचे क्षेत्रफळ मोठे असते. यामुळे मजुरदार लावूनही फारसा उपयोग होत नसून फवारणीसाठी अधिक वेळ खर्च होतो. यासाठी या शेतकऱ्याने शक्कल लढवत मिनी ट्रॅक्टरच्या मागील भागात उपकरण जोडून पंपाची निर्मिती केली आहे. त्यांना कृषी पुरस्कारही प्राप्त करण्यात आला होता. या यांत्रिकिरणाच्या जुगडाचे नेमकं कारण त्यांनी सांगितले आहे.

शेती अवजारे सर्वात कमी किंमतीत कुठे मिळतील?

शेतकरी मित्रांनो शेती अवजारे सर्वात कमी किंमतीत हवी असतील तर गुगल प्ले स्टोअर वर जाऊन Hello Krushi हे अँप एकवेळ आवश्य वापरून पहा. इथे राज्यातील सर्व शेत अवजार दुकानदार उपलब्ध असून तुमच्या गावातीच्या आसपासच्या दुकनदारांना संपर्क करण्याची सुविधा अँपवर आहे. यामुळे कुठे किती रुपयांना कोणते शेती अवजार आहे याबाबतची अचूक माहिती तुम्हाला मिळते. तसेच अनेक अवजारांवर मोठी सूट देण्यात आली असल्याने सर्वात कमी किंमतीत शेत अवजारे उपलब्ध होतात. तेव्हा आजच Hello Krushi अँप डाउनलोड करा.

शेतीच्या यांत्रिकीकरणामागे शेतकऱ्याचा जुगाड (Agriculture Technology)

पारंपरिक शेतीत आधी वेळ, मजूरदारांसाठी पैसे खर्च करावे लागतात. वेळ, अधिक पैसा खर्च होऊ नये यासाठी बाळासाहेब यांनी एक घरबसल्या यांत्रिकी उपकरण बनवलं आहे. याबद्दल त्यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, “सकाळी आणि संध्याकळी मजुरांकडून पिकांना फवारणी मारून घ्यावी. मात्र शतीचे क्षेत्रफळ हे मोठे असल्याने मजुरांना फवारणी करणे शक्य होत नाही. त्यांची शारीरिक मेहनत अधिकच होते. यात महत्त्वाची बाब म्हणजे तापमानामुळे दुपारी कीटकनाशके झाडावर पडण्यापूर्वी त्याचे विघटन होते. वाऱ्याचा वेग अधिक नसल्याने बरेच द्रावण बाहेर पडते. सकाळी आणि संध्याकाळी जास्तीची अंगमेहनत होऊ नये.” म्हणून त्यांनी जुगाड केल्याचं म्हटलं आहे. यामुळे त्यांना गेवराई येथे कृषी पुरस्कार प्राप्त झाला आहे.

गेवराई येथे कृषी पुरस्कार प्राप्त

बाळासाहेब शिंदे यांना बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील कृषी पुरस्कार प्राप्त झाला आहे. नवनवीन पीक घेणे, कमी खर्च अधिक उत्पादन, जुगाड पद्धती, यांत्रिकीकरण हे सर्वगुण संपन्न व्यक्तिमत्त्व आपल्या शेती क्षेत्रात शिंदेंनी दाखवल्याने गेवराई तालुक्यातील कृषी प्रदर्शनात शिवसंग्राम पक्षाच्या अध्यक्षा डॉ. ज्योती मेटे यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला.

error: Content is protected !!