Agriculture Technology : बंद पडलेल्या बोअरला पाणी कसं आणायचं? शेतकऱ्याच्या मुलानं बनवलं जबरदस्त तंत्रज्ञान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर (Agriculture Technology) : भारतात उन्हाळा हा शेतकरी बांधवांसाठी कसोटीचा ऋतू असतो. शेतीसाठी अधिकाधिक पाण्याची आवश्यकता भासते. परंतु हे पाणी उन्हाळ्यामुळे मूलतः कमी प्रमाणत असते. काही वेळा बोअरमधील पाणी हे संपते. कधी कधी बरेच दिवस पाण्याच्या तुटवड्यामुळे बोअर भरली जात नाही. अशातच आता सोलापूरातील IIT या विद्यापिठातून अभियंता (Engineering) पदवी मिळवलेल्या एका तरुणाने कमाल केली आहे. या बंद पडलेल्या बोअरला त्याने स्वतः चालू केल्या असून त्याचे कौतुक स्वतः केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केलं आहे.

शेतकऱ्यांच्या सततच्या बंद पडलेल्या बोअरला विशाल बगले यांनी जीवनदान दिलं असं म्हटलं तरीही काही हरकत नाही. खनिज अभियंता हि पदवी घेऊन त्याने शेतकऱ्यांचे पांघ फेडले आहेत. याआधी त्याचे वडील देखील अभियांत्रिकी होते. त्यांच्याच पाऊलावर पाऊल ठेऊन विशालने आगेकूच केली. पेट्रोलियम कंपनीत वापरल्या जाणाऱ्या केमिकल स्टेम्युलेशनचा वापर करून बोअरचे पाणी वाढवता येईल का? यावर त्याने संशोधन केलं. हे संशोधन गेली २० वर्षांपासून करत आहे.

तुमच्या बोरवेलसाठी हे तंत्रज्ञान वापरून पाणी आणायचं असेल तर हे काम करा

शेतकरी मित्रांनो सध्या अनेक शेतकरी नवनवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रगतशील शेती करत आहेत. अनेक शेतकऱ्यांनी तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या बोरवेलला पाणी आणलं आहे. तुम्हालासुद्धा तुमच्या बोरवेलला अशा पद्धतीने पाणी आणायचं असेल तर खालील स्टेप्स फॉलो करून आजच सेवा घ्या. यासाठी तुम्हाला सर्वप्रथम गुगल प्ले स्टोअरला जाऊन Hello Krushi नावाचे मोबाईल अँप डाउनलोड करावे लागणार आहे. त्यानंतर नाव, मो. नं. टाकून मोफत रजिस्ट्रेशन केल्यावर तुम्हाला शेतकरी दुकान या विभागात जाऊन हि सेवा निवडायची आहे. Hello Krushi अँप च्या मदतीने तुम्ही या तंत्रज्ञानाची सेवा बुक करून याचा फायदा घेऊ शकता. तेव्हा आजच गुगल प्ले स्टोअरवरून Hello Krushi डाउनलोड करा.

  • सर्वात अगोदर गुगल प्ले स्टोअरवरून Hello Krushi नावाचे मोबाईल अँप डाउनलोड करा.
  • त्यानंतर मोबाईल नंबर, नाव, गाव आदी माहिती भरून मोफत रजिस्ट्रेशन करून घ्या.
  • आता App ओपन केल्यांनतर होम स्क्रीनवर शेतकरी दुकान या विभागावर क्लिक करा.
  • आता तुम्हाला शेतकरी दुकान विभागात एकूण २० वेगवेगळ्या सेवा दिसतील. यामधील खाली स्क्रोल करून शेती निगडित सेवा या चौकटीवर क्लिक करा.
  • आता तुम्हाला शेतीशी निगडित विविध सेवांची यादी दिसेल. यापैकी बोअरवेल पाणी आणून दिले जाईल यावर क्लिक करा.

काय आहे नेमकं तंत्रज्ञान? Agriculture Technology

विशाल बगले यांनी गेली २० वर्षांपासून म्हणजेच २००३ पासून हे काम करण्यास सुरुवात केली आहे. पेट्रोलियम कंपनीच्या केमिकल स्टेम्युलेशन या तंत्रज्ञानापासून त्याने अनेक शेतकऱ्यांच्या बोअरचा प्रश्न मिटवला आहे. ज्या बोअरमध्ये कमी पाणी होते. त्या बोअरमध्ये पाणी वाढवण्याचे काम त्यांनी १०० % केले. त्यानंतर ज्या बोअरमध्ये पाणीच नव्हते त्यामध्ये ८० % पाणी आणण्याचे तंत्रज्ञान विकसित केलं.

बोअरवर हि प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी किती खर्च येतो?

बोअरवर हि प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी किमान ७ ते १० हजार रुपयांचा खर्च येतो. तर एकदा प्रक्रिया करण्यासाठी साधारण दोन ते चार वर्षे पाण्याचे प्रमाण वाढत असल्याचे विशाल बगले म्हणाले. तसेच या प्रक्रियेमुळे पाईपला कोणताही धोका होणार नाही. हि प्रक्रिया कमी खर्चिक आणि सोयीस्कर असल्याचे विशाल म्हणाले आहेत.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केलं कौतुक

लातूर येथील दोन शेतकऱ्यांनी विशाल यांच्याशी संपर्क साधला. यामुळे त्यांचे बंद पडलेले बोअर सुरु झाले. त्याच्या शेतातील पिकं पाण्याने बहरू लागली डोलू लागली. विशाल यांच्या या संशोधनाचे कौतुक केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी देखील केलं आहे. Agriculture Technology

error: Content is protected !!