Agriculture Technology : शेतातील दगडाची अडचण दूर होणार; स्टोन पिकर मशीन उपयुक्त ठरणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : देशात काही वर्षांपासून पारंपारिक शेती व्यवसायाला अधिक मागणी होती. आजही ती मागणी आहे, मात्र शेती व्यवसायात बदलत्या काळानुसार शेतकरी यंत्राचा वापर करू लागला आहे. शेतीची पूर्वमशागत ते पिकांची काढणी इथपर्यंत कामे आता यंत्राद्वारे होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या वेळेत आणि पैशामध्ये बऱ्यापैकी बचत होताना दिसतेय.

शेती करत असताना शेतीची मशागत करणे गरजेचे असते. अशावेळी मोठ मोठे दगड – धोंडे शेतात आढळतात. हे दगड काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण होऊ शकतात. हे दगडगोटे बाहेर काढणे मोठं जिकिरीचं काम आहे. आता चिंता करण्याची गरज नसून यासाठी स्टोन पिकर हे मशीन फार उपयुक्त ठरत आहे.

डोंगराळ भागात मशागत करत असताना बरेचसे दगड-गोटे आढळतात. यामुळे मशागतीसाठी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. मात्र या यंत्राद्वारे शेतातील बारीक दगड – गोटे सहजपणे वेचून शेत स्वच्छ करता येते. या यंत्राचे वैशिष्ठ म्हणजे छोट्यापासून ते मोठे दगडगोटे एकाच वेळेस उचलून घेतले जाते. या यंत्राला ट्रॅक्टरची आवश्यकता असते. तसेच एका एकर क्षेत्रात दोन तासात सर्व दगड – गोटे उचलून देण्याची क्षमता या यंत्रात आहे.

या यंत्रामुळे आता शेतीची मशागत करणे सोपे होते आणि कमी कष्ट लागतात. शेतजमीनही स्वच्छ राहील. शेतजमीन स्वच्छ राहिल्याने पीक उत्पादनाचा फायदा शेतकऱ्यांना होईल. जमीन उत्पादनक्षम बनते आणि पिकांची गुणवत्ता सुधारते. यामुळे स्टोन पिकर मशीन उपयुक्त ठरत आहे.

error: Content is protected !!