Kadba Kutti Machine : कडबाकुट्टी वापरताना अपघात टाळण्यासाठी घ्या अशाप्रकारे काळजी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Kadba Kutti Machine : कडबाकुट्टी यंत्र म्हणजेच चाफकटरचा वापर करताना अनेकदा अपघात होतात. काही वेळेस जीवही गमवावा लागतो. अशावेळी पशुपालकांनी योग्य ती काळजी घेणे महत्त्वाचे असते. असे अपघात अनावधानाने नकळत घडत असतात त्यामुळे अशा अपघातापासून वाचण्यासाठी पशुपालकांनी खबरदारी घेतली पाहिजे. विजेची अशी साधने वापरताना पशुपालकांनी सतर्क व दक्ष राहणे आवश्यक आहे.

अपघात टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी?

– घरातील तसेच गोठ्यातील वायरिंगची अर्थिंग करून घेणे.
– त्याचबरोबर ELCB बसवून घ्यावे. कारण अनावधानाने लिक करंट झाला तर अटोमॅटिक बंद होवून विद्युत पुरवठा खंडित होतो. ELCB हे विद्युत धोक्यापासून सुरक्षाकवच आहे.

– कडबा कुटी वापरताना जुनी खराब वायर, पिन, स्विच वेळेवर बदलून घ्यावेत. प्लगमध्ये उघड्या, वायर खोवणे, त्यावर लाकडी खाड्या खोचणे असे प्रकार करू नयेत.

– मशीनचे वायरिंग चांगल्या वायरमन कडून करून घ्यावे. अनेकदा वायरला मध्ये जोड दिलेला असतो. त्या ठिकाणी चिकटटेप लावले जातात. काही वेळा हा चिकटटेप निघून आतील तार उघडी पडते. त्यामुळे धोका निर्माण होतो. कडबाकुट्टी मशीनला जोडलेली वायर चांगल्या दर्जाची असावी.

– चाफ कटरच्या मोटारीखाली वाळलेली फळी बसवावी. सुरक्षेच्या दृष्टीने मोटारीखाली लाकडी फाउंडेशन फार महत्त्वाचे असते. तसेच चाफ कटर ठेवलेल्या ठिकाणची जागा कोरडी असावी.

– मशीन वापरताना पायामध्ये रबरी किंवा प्लॅस्टिकची चप्पल घालावी.
दोन ते तीन वर्षातून एकदा मोटार वार्निशिंग मशीन करून घ्यावी. त्यामुळे तारेचे कोटिंग मजबूत होते. त्याचबरोबर लिकेज करंट टाळता येतो.

– बरेचदा कडबाकुट्टी यंत्राची फिरती पात्यासमोरची जाळी शेतकऱ्यांकडून काढली जाते. ही जाळी काढू नये.

– ओली व सुकी वैरण कुट्टी यंत्रात ढकलताना सावधगिरी बाळगली पाहिजे. कंपनीने यंत्रावर लावलेल्या सूचनांचे पालन करावे. तसेच वेळोवेळी तज्ज्ञ वायरमन कडून वायरिंग व्यवस्थित तपासणी करून घ्यावी.

काहीसा निष्काळीपणा धोकादायक ठरू शकतो त्यामुळे शेतकऱ्यांनी कडबा कुट्टी वापरताना सावधगिरी बाळगावी.

error: Content is protected !!