हॅलो कृषी ऑनलाईन । पुढील दोन चार दिवस राज्यातील अनेक भागात विजांच्या गडगडाटासह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यादरम्यान शेतकऱ्यांनी आपले नुकसान टाळण्यासाठी काय खबरदारी घ्यावी याबाबत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी यांनी काही गोष्टी सांगितल्या आहेत. ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
- काढणी केलेल्या हरभरा, करडई, गहू, रब्बी ज्वारी पिकाची मळणी लवकरात लवकर करून घ्यावी.
- मळणी केलेल्या मालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. तूरळक ठिकाणी झालेल्या पावसामूळे काढणी केलेले पिक भिजले असल्यास वाळल्यानंतर मळणी करावी.
- दि. 13 व 14 मार्च रोजी तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज लक्षात घेता काढणी/मळणी केलेला माल पावसात भिजणार नाही याची दक्षता घ्यावी.
- सध्या हळदीची काढणी, हळद उकडणे, वाळवणे, पॉलिश करणे ही कामे सुरू आहेत. दि. 13 व 14 मार्च रोजी तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज लक्षात घेता, हळदीची उघडयावर साठवण करू नये.
- दि. 13 व 14 मार्च रोजी तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज लक्षात घेता काढणीस तयार असलेल्या मृग बहार फळांची, द्राक्ष फळांची, काढणी करून घ्यावी.
- फळधारणा सुरू असलेल्या अंबे बहार संत्रा/मोसंबी बागेस आवश्यकतेनूसार सकाळी किंवा संध्याकाळी पाणी द्यावे.
- जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी व जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी संत्रा/मोसंबी फळझाडाच्या आळयात आच्छादन करावे.
- वादळी वारा व पाऊस यामूळे फळबागेत पडलेली फळे गोळा करून नष्ट करावीत. तसेच मोडलेल्या फांद्यांची छाटणी करून त्यावर 1% बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी.
- द्राक्ष बागेस आवश्यकतेनूसार सकाळी किंवा संध्याकाळी पाणी द्यावे. जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी व जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी द्राक्ष बागेत आच्छादन करावे.
- वादळी वारा व पाऊस यामूळे फळबागेत पडलेली फळे गोळा करून नष्ट करावीत.
- आंबा बागेत आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.
- सध्या आंबा बागेत वटाणा व सुपारीच्या आकाराच्या आंबा फळांची गळ दिसून येत आहे. याच्या व्यवस्थापनासाठी बागेत एनएए 15 पीपीएम ची फवारणी करावी.
- वादळी वारा व पाऊस यामूळे फळबागेत पडलेली फळे गोळा करून नष्ट करावीत.
दि. 13 व 14 मार्च रोजी तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज लक्षात घेता, काढणी केलेल्या ज्वारीचा कडबा पावसात भिजणार नाही याची दक्षता घ्यावी. कारण पावसात भिजल्यास त्याची प्रत खालावून साठवण क्षमता कमी होते व भिजलेला कडबा जनावरे खात नाहीत.
दि. 13 व 14 मार्च रोजी तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज लक्षात घेता, काढणीस तयार आसलेल्या भाजीपाला पिकांची तसेच टरबूज, खरबूज इत्यादी पिकांची काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवण करावी. भाजीपाला पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. भाजीपाला पिकास आवश्यकतेनूसार सकाळी किंवा संध्याकाळी पाणी द्यावे.
दि. 13 व 14 मार्च रोजी तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज लक्षात घेता, जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू नये. निवा-याच्या ठिकाणी बांधावे व पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्यावी. पशूधनास खुले पाणी, तलाव किंवा नदीपासून दूर ठेवावे, ट्रक्टर आणि इतर धातूंच्या शेती अवजारांपासून दूर ठेवावे व पशुधनास झाडाखाली जमा होऊ देऊ नये. तसेच पाऊस चालू होण्याच्या वेळी झाडाच्या आडोशाला थांबु नये.