हॅलो कृषी ऑनलाईन: आता कृत्रिम बुद्धिमत्ता या तंत्रज्ञानाच्या आधारे ऊस तोडणी (AI-Based Sugarcane Harvesting) करता येणार आहे. एसएम शंकरराव कोल्हे एसएसके साखर कारखान्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित ऊस तोडणी (AI-Based Sugarcane Harvesting) कार्यक्रम सादर करणारी महिंद्रा ही (Mahindra Company) पहिली कंपनी ठरली आहे. हे तंत्रज्ञान महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, तामिळनाडू आणि हरियाणामधील 1 लाख एकर जमिनीवर तैनात केले आहे.
देशातील साखर उद्योगासाठी (Sugar Industry) साखर-प्रमाण-आधारित उसाची तोडणी (Sugarcane Harvesting) करणाऱ्या कंपनीमध्ये महिंद्रा अँड महिंद्रा अग्रणी आहे. आता AI आधारित ऊस तोडणी कार्यक्रम ऑफर करणारी देशातील पहिली कंपनी बनली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील सहकार महर्षी शंकरराव कोल्हे एसएसके लिमिटेड (SM Shankarrao Kolhe SSK Sugar Mill) या कंपनीने ही सुविधा (AI-Based Sugarcane Harvesting) उपलब्ध करून दिली आहे.
सहकार महर्षी शंकरराव कोल्हे यांच्या अंतर्गत 2024 च्या गाळप हंगामात संपूर्ण नोंदणीकृत ऊस क्षेत्रासाठी तैनात केलेले, AI-आधारित तंत्रज्ञान (AI-Based Sugarcane Harvesting) ऊस पिकांच्या वेळेवर काढणीसाठी आणि साखरेच्या अचूक अंदाज देण्यासाठी सक्षम आहे.
कृत्रिम बुद्धिमत्ता ऍप्लिकेशन्स शेतीसाठी (Sugarcane Farming) अत्यंत फायदेशीर ठरू शकतात आणि अनेक फायदे देऊ शकतात. ऊस लागवडीखालील शेतजमिनीवर AI तंत्रज्ञान ऊस तोडणीची अचूक वेळ आणि योग्य साखरेचे प्रमाण जाणून घेण्यासाठी महत्वाचे ठरते, त्यामुळे जास्तीत जास्त उत्पादन मिळू शकते. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून, शेती करण्याच्या पद्धतीत परिवर्तन घडवून आणण्याचे आमचे उद्दिष्ट आहे असे महिंद्रा कंपनीतर्फे सांगण्यात आले.
कोल्हे साखर कारखाना भारतातील पहिली कंपनी आहे ज्याने AI-आधारित कापणी तंत्रज्ञान लागू केले आहे. त्यांनी तीन वर्षांपूर्वी 3,000 एकर जमिनीवर एक पथदर्शी प्रकल्प राबवला, परिणामी त्यांचा नफा वाढला आणि साखरेचा उतारा सुद्धा जास्त मिळाला. त्या निकालांच्या आधारे, या वर्षी पुन्हा महिंद्रासोबत करार करण्याचे कोल्हे साखर कारखाना यांनी ठरवले आहे आणि त्यांच्या संपूर्ण पाणलोट क्षेत्रात हे तंत्रज्ञान लागू करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
ऊस तोडणीत क्रांती घडवण्याच्या ध्येयाने, महिंद्राने विविध ऊस कारखान्यांसोबत चार वर्षांहून अधिक काळ काम केले आहे. या क्रांतिकारी तंत्रज्ञानामुळे (AI-Based Sugarcane Harvesting) भारतातील साखर कारखानदारांना आणि भारतीय शेतकऱ्यांना दीर्घकालीन फायदा होण्याची क्षमता आहे.