Akola News : सध्या राज्यासह देशभरात पावसाने थैमान घातले आहे अनेक दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाचे बुधवारपासून जोरदार आगमन झाले आहे. यामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. बऱ्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात जीवित हानी झाली आहे. मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांवर देखील मोठ संकट ओढवल आहे.
राज्याच्या बऱ्याच भागात मुसळधार पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांचे (Farmer) मोठे नुकसान झाल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी साचले आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी पेरणी केलेले धान्य आता कुठे उगवून आले होते तोच ते धान्य पाण्यात बुडाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठ संकट उभा राहिले आहे. सरकारकडून मदत मिळावी अशी बऱ्याच शेतकऱ्यांची मागणी आहे. (Akola News)
दरम्यान, अकोला जिल्ह्यात देखील पावसाने धुमाकूळ घातला आहे. या ठिकाणी शेतामध्ये तर पाणीच पाणी दिसत आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मागच्या काही दिवसापासून पाऊस पडत नसल्यामुळे शेतकरी चिंतेत होते मात्र आता पाऊस जास्त पडल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. अकोल्यात बऱ्याच ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
अकोला जिल्ह्यात मूर्तिजापूर, बार्शीटाकळी, या ठिकाणी झालेल्या मुसळधार पावसामुळे सुमारे १४ हजार २९२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे तर, ५१५ हेक्टर जमीन खरडून गेली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे
‘या’ ठिकाणी पाहा रोजचा हवामान अंदाज
शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला दररोजचा हवामान अंदाज पाहायचा असेल तर आत्ताच प्ले स्टोअर वर जाऊन आमचे Hello Krushi हे ॲप इंस्टॉल करा. यामध्ये तुम्हाला रोजचा हवामान अंदाज तर पाहायलाच मिळेल त्याचबरोबर सरकारी योजना, बाजार भाव, पशुंची खरेदी विक्री, जमीन मोजणी इत्यादी गोष्टींची माहिती मिळेल ती ही अगदी मोफत. त्यामुळे आत्ताच प्ले स्टोअर वर जाऊन आपले Hello krushi हे ॲप इंस्टॉल करा.