Aloe Vera Farming : कोरफडीच्या शेतीसाठी ‘या’ आहेत पाच प्रमुख प्रजाती!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या आरोग्याबाबत लोक मोठ्या प्रमाणात जागरूक होत आहेत. कोरोना महामारीनंतर (Aloe Vera Farming) अनेकांनी आपल्या आरोग्यास प्राधान्य देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आयुर्वेदिक आणि रोगप्रतिकार शक्ती (Aloe Vera Farming) वाढवणाऱ्या वस्तूंची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच आता कोरफड शेती शेतकऱ्यांसाठी फायद्याची शेती म्हणून पुढे येत आहे. सौंदर्य प्रसाधनांमध्ये आणि आयुर्वेदिक औषधांमध्ये कोरफडीचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याने शेतकरी कोरफड लागवडीकडे वळत आहेत. त्यामुळे आज आपण कोरफड शेतीबाबत माहिती जाणून घेणार आहोत…

कोरफड शेतीची (Aloe Vera Farming) एक विशेषतः म्हणजे एकदा लागवड केल्यानंतर तुम्हाला त्यातून वर्षानुवर्षे उत्पादन मिळू शकते. देशातील सर्व राज्यांमध्ये कोरफड शेती केली जाऊ जाते. त्यामुळे कोरफडी शेती शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात फायद्याची ठरत आहे. त्यामुळे तुम्हीही कोरफड शेती करू इच्छित असाल तर त्यासाठी कोणत्या प्रमुख जाती आहेत. ज्या तुम्हाला चांगले उत्पन्न मिळवून देण्यात मदत करतील. तर यामध्ये टाइगर एलो, एलो डेस्कइंगसी, रेड एलो, एलो ब्रेविफोलिया आणि एलो एरिस्टाटा या कोरफडीच्या पाच प्रमुख जाती मानल्या जातात.

कोरफडीच्या पाच प्रमुख जाती (Aloe Vera Farming Five Major Species)

 • टाइगर एलो प्रजाती
  सर्व प्रजातींमध्ये ही कोरफडीची सर्वात उत्तम प्रजाती मानली जाते. या प्रजातीला एखाद्या छोट्याशा कुंडीमध्ये देखील लावले जाऊ शकते. या जातीची शेती म्हणून लागवड केल्यास तुम्हाला यातून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळू शकते. या जातीची पाने ही तलवारीच्या आकाराची असतात.
 • एलो डेस्कइंगसी प्रजाती
  ही कोरफडीची सर्वात लहान जात मानली जाते. जिची उंची ही केवळ दोन ते तीन इंच इतकी असते. या जातीची गडद हिरव्या रंगाच्या पानांवर पांढरे ठिपके असतात. वसंत ऋतूमध्ये उन्हाळयाच्या दिवसांमध्ये या जातीच्या कोरफडीला पिवळे नारंगी फुले येतात.
 • रेड एलो प्रजाती
  लाल कोरफड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या कोरफडीमध्ये प्रतिजविकांचा गुणधर्म असतो. त्यामुळे मानवी शरीरासाठी ही जात सर्वात उत्तम मानली जाते. या जातीची वाढ संथ गतीने तसेच तिला अल्प प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते. ही सर्वात आकर्षक जात म्हणून ओळखली जाते. सूर्य किरण पडताच ती लाल तांबूस रंगाची दिसते.
 • एलो ब्रेविफोलिया प्रजाती
  ही कोरफडीची लहान पाने असलेली जात आहे. तिच्या भुरक्या रंगाच्या पानांवर कधीकधी नारंगी रंग दिसून येतो. ज्यामुळे हिवाळ्यात दिवसांमध्ये ही आकर्षक जात मानली जाते.
 • एलो एरिस्टाटा प्रजाती
  कोरफडीची ही जात अन्य जातींपेक्षा खूपच वेगळी मानली जाते. कारण तिच्यामध्ये कडाक्याची थंडी सहन करण्याची क्षमता आहे. या प्रजातीला जास्त उन्हाची आवश्यकता नसते. ही प्रजाती आपल्या सफेद तुरे आणि ओबडधोबड पानांसाठी विशेष ओळखली जाते.
error: Content is protected !!