Alternative Uses Of Stubble: शेतकऱ्यांनो, जाळू नका पिकांचे अवशेष आणि पाचट, ‘या’ 11 नाविन्यपूर्ण पद्धतीने करा त्यांचा वापर!   

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: भारतात बहुतेक भागात अजूनही पाचट (Alternative Uses Of Stubble) किंवा पिकांचे उरलेले अवशेष अजूनही जाळले जाते, जे पर्यावरणास हानीकारक असते. परंतु तुम्हाला माहित आहे का हे अवशेष आणि पाचट नाविन्यपूर्ण पद्धतींद्वारा मौल्यवान संसाधनात रूपांतरित केले जाऊ शकते, (Managing Stubble) ज्यामुळे शेतकर्‍यांना नफा तर वाढेलच शिवाय पर्यावरणाचे सुद्धा संवर्धन होईल (Alternative Uses Of Stubble).

पीक कापणीनंतर लाखो टन पेंढा तयार होतो, जो सामान्यत: जाळला जातो. या प्रथेमुळे वायू प्रदूषण तर होतेच, शिवाय जमिनीचे आरोग्य बिघडते, आणि कृषी उत्पादकतेवर नकारात्मक परिणाम होतो. पाचट किंवा पिकांचे अवशेष यांचे योग्य व्यवस्थापन करून या कृषी उप-उत्पादनाला शाश्वत शेतीसाठी वापरून यातून शेतकरी नफा कमवू शकतात. हे परिवर्तन साध्य करण्यासाठी 11 नाविन्यपूर्ण मार्ग (Alternative Uses Of Stubble) आहेत. जाणून घेऊ याविषयी सविस्तर.   

शेतातील कचरा वापरण्याच्या नाविन्यपूर्ण पद्धती (Alternative Uses Of Stubble)

  • जमिनीच्या पोषणासाठी सेंद्रिय कंपोस्ट: पिकांचे अवशेष किंवा पाचट जाळण्याऐवजी, त्यापासून कंपोस्ट खत (Organic Compost) निर्मिती करून जमिनीला आवश्यक पोषक तत्त्वे देऊ शकता ज्यामुळे जमिनीची सुपीकता आणि पिकांचे उत्पादन वाढते. एक एकर जमिनीतून 2-3 टन अवशेष मिळते यापासून सुमारे 1.5 टन कंपोस्ट खत करता येते. यामुळे रासायनिक खताचा वापर 30% पर्यंत कमी होतो. जर भारतातील 25% पीक अवशेष कंपोस्टमध्ये रूपांतरित केले तर दरवर्षी 5 दशलक्ष टन कृत्रिम खतांची बचत होऊ शकते.
  • कचऱ्यापासून बायोगॅस ऊर्जा उत्पादन: बायोगॅससाठी पिकांचे अवशेष ही उत्कृष्ट सामग्री आहे, जी ग्रामीण भागात स्वयंपाक करण्यासाठी स्वच्छ ऊर्जा (Biogas Production From Waste) प्रदान करते. यामुळे जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी होऊन भारताच्या ग्रामीण ऊर्जेच्या 20-25% गरजा पूर्ण होऊ शकतात (Alternative Uses Of Stubble).
  • मशरूम लागवड: मशरूम लागवडीसाठी (Mushroom Cultivation) गवत हे सब्सट्रेट म्हणून काम करते, ज्याला जास्त मागणी आहे. एक टन गवतावर 200-300 किलो मशरूम निर्मिती होते. मशरूमच्या प्रत्येक कापणीतून 10,000-15,000 रूपये उत्पन्न मिळवता येते.
  • जनावरांचा चारा: पेंढा हा कमी किमतीचा चारा म्हणून एक चांगला पर्याय आहे ज्यामुळे पशुखाद्य खर्चात बचत होऊ शकते. पेंढा जनावरांना देण्या अगोदर त्यावर प्रक्रिया केल्यास अधिक पौष्टिक चारा तयार करता येतो. यामुळे पशुधन निरोगी राहतील शिवाय पशुपालकांच्या खर्चात सुद्धा बचत होईल.
  • कागद आणि पॅकेजिंग साहित्य निर्मिती: गवत, व पिकांचे उरलेले अवशेष यांचा वापर पर्यावरणपूरक कागद  टिकाऊ पॅकेजिंग साहित्य निर्मिती करण्यात येऊ शकतो. सध्या दिवसेंदिवस अशा पर्यावरणपूरक साहीत्यांची मागणी वाढताना दिसत आहे. भारतातील पीक अवशेषांपैकी फक्त 10% अवशेष रूपांतरित केल्यास देशातील 70% कागदाची मागणी पूर्ण होऊ शकते, ज्यामुळे अब्जावधी रूपयांचा उद्योग निर्माण होईल.
  • बायोचार- माती सुधारक उत्पादन: खोडापासून बनवलेल्या बायोचारमुळे मातीचे आरोग्य (Soil Health) वाढते आणि कार्बन उत्सर्जित होते. त्याचा वापर पीक उत्पादनात 10-20% वाढ करू शकते आणि भारतातील हरितगृह वायू उत्सर्जन 5% पर्यंत कमी करू शकतो.
  • इको-फ्रेंडली बांधकाम फायबर: पीक अवशेषांचा वापर पर्यावरणपूरक विटा आणि पटल यांसारख्या टिकाऊ बांधकाम साहित्यात (Eco Friendly Construction) केले जाऊ शकते. यामुळे पारंपारिक बांधकाम संसाधने यांचा 20% कमी वापर होऊन पर्यावरणपूरक हरित पद्धतींना हातभार लागतो (Alternative Uses Of Stubble).
  • बायोइथेनॉल इंधन उत्पादन: खोडाचे बायोइथेनॉलमध्ये (Bioethanol Production)रूपांतर केल्याने स्वच्छ-जळणारा नूतनीकरण योग्य इंधन स्रोत उपलब्ध होतो. देशात वर्षभर तयार होणार्‍या पीक अवशेषापासून सुमारे 100 अब्ज लिटर इथेनॉल तयार होऊ शकते. यामुळे पेट्रोलियम आयात 20% कमी होऊन शेतकर्‍यांसाठी 60,000 कोटींचा महसूल निर्मिती होऊ शकते (Alternative Uses Of Stubble).
  • बायोएनर्जी वीज निर्मिती: नूतनीकरणक्षम वीज निर्मितीसाठी बायोमास पॉवर प्लांटमध्ये गवताचा वापर केला जाऊ शकतो. एक टन गवतापासून 1 MWh पर्यंत वीज निर्माण होऊ शकते. जे एका दिवसासाठी 50 घरांना वीज पुरवू शकते.
  • इको-फ्रेंडली औद्योगिक पुठ्ठा उत्पादन: पीक अवशेषांवर प्रक्रिया करूनपारंपारिक पॅकेजिंग मटेरियलला इको-फ्रेंडली पुठ्ठा हापर्याय उपलब्ध करता येते. शाश्वत पॅकेजिंगची मागणी वार्षिक 6.5% वाढण्याची शक्यता आहे, ज्यामुळे शेतकर्‍यांना आर्थिक संधी उपलब्ध होतील (Alternative Uses Of Stubble).
  • मृदा संवर्धनासाठी मल्चिंग: शेतातील पालापाचोळा आच्छादन किंवा मल्चिंग म्हणून (Mulching) वापरल्यास जमिनीतील पाण्याचे बाष्पीभवन कमी करून आणि ओलावा टिकवून धरून मातीचे आरोग्य सुधारते. हे तंत्र पाण्याचा वापर 25% कमी करू शकते आणि पीक उत्पादन 15-20% वाढवू शकते. भारतीय शेतीमध्ये पाणी व्यवस्थापनात यामुळे क्रांती घडू शकते (Alternative Uses Of Stubble).
error: Content is protected !!