Ambika Masala : शेतमजूर ते महिला उद्योजिका; कमलताई परदेशी यांचे निधन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतमजूर ते कोट्यवधींची उलाढाल असलेल्या अंबिका मसाले (Ambika Masala) उद्योगाची उभारणी करणाऱ्या कमलताई परदेशी यांचे निधन झाले आहे. पुण्यातील ससून रुग्णालयात कॅन्सर या दुर्धर आजारामुळे वयाच्या 63 व्या वर्षी आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील खुटबाव या त्यांच्या मूळगावी त्यांच्यावर (Ambika Masala) अंत्यसंस्कार केले जाणार आहे.

कमलताई परदेशी यांचा आयुष्यातील प्रवास (Ambika Masala) थक्क करणारा होता. वर्ष 2000 साली शेतमजुरीला जात मिळणाऱ्या रोजंदारीच्या पैशांतून मसाला व्यवसाय सुरु केला होता. विशेष म्हणजे त्यांनी या व्यवसायात प्रवेश केला तेव्हा त्यांच्याकडे कोणतेही भांडवल नव्हते. आपली शेतमजुरी हेच त्यांचे भांडवल आणि सर्वस्व होते. सुमारे 23 वर्षांपूर्वी अंबिका मसाले या ब्रँडची सुरुवात आपल्या झोपडी वजा घरातून केली होती. मात्र आज त्यांच्या या अंबिका मसाल्यांना देशातच नाही परदेशात देखील मोठी मागणी आहे.

‘अंबिका मसाले’ ब्रँड (Ambika Masala Kamaltai Pardeshi Passed Away)

कमलताई परदेशी स्वतः निरक्षर असूनही, त्यांनी शेतमजुरीच्या जोरावर मसाले व्यवसायात पाय रोवले. सुरुवातीला 2000 साली त्यांनी व्यक्तिगत पातळीवर मसाले विक्री केली. हळूहळू व्यवसायात जम बसू लागल्याचे पाहताच त्यांनी महिला बचत गटाच्या माध्यमातून आपला ‘आंबिका मसाले’ नावाचा ब्रँड तयार केला. त्यांचा हा मसाले ब्रँड आज घराघरात पोहचला असून, याद्वारे त्यांनी जवळपास 800 महिलांना रोजगार मिळवून दिला आहे. मात्र आज त्यांच्या निधनाने ‘आंबिका मसाले’ ब्रँड पोरका झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

अँजेला मर्केल यांच्याकडून कौतुक

महिला बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या व्यवसायाची वृद्धी केल्यानंतर त्या मुंबईतल्या प्रदशर्नांमध्ये आणि बिग बाजारमध्ये मसाल्यांची विक्री करू लागल्या. ‘आदर्श उद्योजिका’सहित अनेक पुरस्कारांनी त्यांना आजवर गौरविण्यात आले आहे. जर्मनीच्या चान्सलर अँगेला मर्केल यांनीही कमलताईंच्या कामाचे कौतुक करत त्यांना जर्मनीमध्ये आपल्या मसाले व्यवसायाची वृद्धी करण्यासाठी बाजारपेठ उपलब्ध करून दिली होती.

error: Content is protected !!