Ancestral Land : वडिलोपार्जित जमीन वडिलांना विकता येते का? वाचा पुन्हा कशी मिळवाल!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : वारसा हक्क कायद्यामुळे विभाजन होऊन, सध्या ग्रामीण भागात जमिनींचे प्रमाण कमी होत चालले आहे. परिणामी वडिलोपार्जित जमिनीवरून (Ancestral Land) मोठ्या प्रमाणात वाद होत असल्याचे पाहायला मिळते. कधीकधी तर मुलांच्या संमतीविना वडील वडिलोपार्जित जमिनीची विक्री करून टाकतात. मात्र वडिलोपार्जित जमीन विक्री करण्याचा अधिकार वडिलांना आहे का? वडिलोपार्जित जमीन विक्री करताना वडिलांना मुलांची संमती घ्यावी लागते का? आणि वडिलोपार्जित जमीन वडिलांनी विकली असेल तर मुले न्यायालयात दाद मागू शकतात का? याबाबत आज आपण सविस्तर माहिती (Ancestral Land) जाणून घेणार आहोत…

वडिलोपार्जित जमीन म्हणजे काय? (Ancestral Land Can Sold To Father)

एखादी व्यक्ती जन्माला येते. त्याच दिवशी त्याला आपल्या वडिलोपार्जित जमिनीमध्ये (Ancestral Land) हक्क मिळालेला असतो. वडिलोपार्जित जमीन किंवा मालमत्ता म्हणजे एखाद्या व्यक्तीला आपली जमीन ही मागील चार पिढ्यांपासून वारसा हक्काने मिळालेली असेल तर ती जमीन ‘वडिलोपार्जित जमीन’ म्हणून ओळखली जाते.

भेट म्हणून मिळाल्यास…

कधी कधी आपल्या वडिलांना आजोबांकडून भेट किंवा बक्षीसपत्र स्वरूपात जमीन मिळालेली असते. मात्र अशी जमीन ही वडिलोपार्जित जमीन मानली जात नाही. वडिलोपार्जित जमीन ही आजोबांच्या मृत्युनंतर, आजोबांना वारसा हक्काने मिळालेली जमीन वडिलांकडे हस्तांतरित झालेली असेल ती जमीन वडिलोपार्जित जमीन मानली जाते.

वडिलांना जमीन विकता येते का?

वडिलोपार्जित जमीन (Ancestral Land) किंवा मालमत्ता ही अविभाजित आहे. अर्थात एखाद्या व्यक्तीचे कुटुंब हे एकत्र कुटुंब पद्धतीने राहत आहे. आणि त्या कुटुंबाची एकत्रित जमीन ही त्या कुटुंबास वाड-वडिलांपासून मिळालेली असेल. तर वडील कुटुंबातील अन्य सदस्यांना विचारल्याशिवाय अशी जमीन विकू शकत नाही. समजा, एखाद्या व्यक्तीला दोन मुले आहेत. अशा व्यक्तीला त्याच्या वडिलांकडून जमीन मिळालेली असेल तर अशा जमिनीत नातवांचा देखील अधिकार असतो. त्यामुळे वडिलोपार्जित जमीन ही मुलांच्या संमतीशिवाय वडिलांना विकता येत नाही. तसा अधिकार वडिलांना नसतो.

शेती संदर्भात अशीच नवनवीन कायदेविषयक माहिती मिळवण्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello Krushi असे सर्च करुन ‘हॅलो कृषी’ नावाचे ऍप डाउनलोड करा. या ऍपच्या माध्यमातून तुम्ही शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची शेतीविषयक माहिती, दररोजचे बाजारभाव आपल्या मोबाईलवर पाहू शकता.

मुले न्यायालयात जाऊ शकतात का?

  • होय, वडिलांनी विकलेली वडिलोपार्जित जमीन परत मिळवण्यासाठी मुलगा न्यायालयात धाव घेऊ शकतो. यासाठी मुलाला आपला वारसा हक्क सिद्ध करावा लागेल. याशिवाय वडिलोपार्जित जमिनीतील त्याच्या वाट्याचा दावा करण्यासाठी मुलाला न्यायालयात दिवाणी दावा दाखल करावा लागेल. त्यानंतर न्यायालय निर्णय घेईल की मुलाला जमीन परत मिळण्याचा अधिकार आहे की नाही?
  • वडिलांनी जमिनीच्या विक्रीच्या तारखेपासून तीन वर्षांच्या आत मुलाने दिवाणी दावा दाखल करावा लागतो. जर मुलगा विक्रीच्या वेळी अल्पवयीन असेल, तर अशा मुलाच्या अन्य नातेवाईकांनी तीन वर्षांच्या आत असा दावा दाखल करावा लागतो.
  • मुलाला आपण जमिनीचे कायदेशीर वारस आहोत. हे सिद्ध करण्यासाठी जन्माचा दाखला, मृत असतील तर वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र आणि वंशवृक्ष यासारखी कागदपत्रे न्यायालयासमोर सादर करावी लागतात.
  • न्यायालयाने मुलाच्या बाजूने निकाल दिल्यास, त्या मुलाची वडिलोपार्जित जमीन खरेदी केलेल्या व्यक्तीला, ती जमीन परत मुलाला विकण्याचा आदेश दिला जातो. मात्र त्यासाठी मुलाला संबंधित जमिनीची किंमत विक्री केलेल्या व्यक्तीला द्यावी लागते.

(वडिलोपार्जित जमिनींचे नियमन करणारे कायदे किचकट असतात. त्यामुळे वडिलोपार्जित जमिनीवर दावा करण्यासाठी दिवाणी खटला दाखल करण्यापूर्वी आपल्या ओळखीच्या एखाद्या वकील मित्राचा किंवा कायदा क्षेत्राचा अभ्यास असलेला व्यक्तीचा सल्ला घेऊनच दावा दाखल करणे योग्य ठरते.)

error: Content is protected !!