Animal Husbandary : जनावरांना दिल्या जाणाऱ्या चाऱ्यांमधून पोषणमुल्यांचा अभाव झाल्यास अभाव झाल्यास जनावरे गाभण राहत नाहीत. गर्भाशयातील वासराचे वजन योग्य प्रमाणात वाढत नाही. १५ ते ३० दिवस आधी जनावर विते. जनावर व्यायल्यानंतर जार अडकणे, भूक मंदावणे ही लक्षणे दिसतात. तसेच जनावरे चप्पल, प्लास्टिक, दगड अशा अखाद्य वस्तू खातात, त्यामुळे जनावर दगावण्याची शक्यता असते. याचे कारण त्या जनावरांच्या शरीरात क्षारांचा (खनिजांचा) अभाव झालेला असतो. त्यामुळे जनावरे वेडीवाकडी चालतात. त्यामुळे जनावरांना खनिज मिश्रण देणे आवश्यक असते.
अनेक पशुपालकांच्या गोठ्यात दुधाळ जनावरे गाभण न राहणे, दुध उत्पादनात घट येणे रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे, आदी समस्यांना सामोरे जावे लागते. जनावरांनी चारा खाल्ल्यानंतर त्यातील घटकांचे विघटन होऊन त्याचे रुपांतर दुधामध्ये होते. गायी किंवा म्हशीच्या दुधात ८० ते ८८ टक्के पाणी असते. या दुधामध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन, क्षार तसेच इतर घटक असतात. दूध घट्ट करणे हे एसएनएफ (Solid Not Fat) चे काम असते. मका, कडवळ, गवती घास या हिरव्या चाऱ्यातून तसेच पशुखाद्यातुन पोषणमूल्य मिळतात.
पशूंची खरेदी विक्री करणे झाले सोपे
शेतकरी मित्रांनो तुम्हाला आता पशूंची खरेदी विक्री करण्यासाठी बाजारात जाण्याची गरज नाही. तुम्ही घरीबसल्या देखील याची खरेदी विक्री करू शकता. यासाठी तुम्हाला प्लेस्टोअरवर जाऊन Hello Krushi हे अँप इंस्टाल करावे लागेल. हे अँप इंस्टाल केल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या पशूचा फोटो टाकून तुम्हचा संपर्क क्रमांक टाकू शकता. यामुळे ज्यांना तुमची गाय किंवा म्हैस घ्यायची आहे. ते शेतकरी तुमच्याशी संपर्क साधतील. त्यामुळे तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. आणि महत्वाचं म्हणजे यासाठी तुम्हाला १ रुपयाही खर्च करायचा नाही. त्यामुळे लगेचच प्ले स्टोअरवर जाऊन हे अँप इंस्टाल करा.
जनावरांना खनिज मिश्रण किती द्यावे
मोठ्या जनावरांना ३० ते ५० ग्रॅम व लहान वासरांना १० ते २० ग्रॅम खनिज मिश्रण दररोज द्यावे. मात्र जनावरांची योग्य गरज ओळखून पशुवैद्यकाच्या सल्ल्याने जनावरांना खनिज मिश्रण देण्याचे प्रमाण ठरवावे. तसेच वासराच्या गोठ्यामध्ये चाटण विटा टांगून ठेवाव्यात.
जनावरांना खनिज मिश्रण देण्याचे फायदे
- खनिज मिश्रणाचा दुधाळ जनावरांच्या आहारात समावेश केल्यास दूध उत्पादनामध्ये वाढ होते.
- तसेच गर्भधारणेचे प्रमाण वाढते.
जनावरांची वाढ झपाट्याने होते. तसेच आरोग्य उत्तम राहते. भूक वाढते आणि प्रकृती सुधारते. - जनावरांना नियमित योग्य प्रमाणात खनिज मिश्रण दिल्यामुळे अखाद्य वस्तू खाणे, चाटणे किंवा चघळणे या सवयी बंद होतात.